माझं गाव

धारुरच्या कारागीरांचा तेलंगणात सन्मान; स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी व 108 मंदिराच्या केलेल्या कामाचे कौतूक.

किल्ले धारूर दि.3 एप्रिल – तेलंगणामधील (Telangana) जगातील सर्वात उंच स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी या पुतळ्याच्या व या परिसरात बांधलेल्या 108 मंदिराच्या कामात उत्त्कृष्ट काम करणाऱ्या किल्लेधारूर येथील कारागीरांचा सत्कार मंदिर संस्थानाच्या वतीने शमशाबाद, हैद्राबाद (Hyderabad) येथे करण्यात आला.

श्री रामानुज आचार्य हे 11 व्या शतकातील भक्ति मार्गातील संत असून त्यांच्या 216 फूटी स्टॅच्यू ऑफ इक्वालिटीचे अनावरण नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. श्री रामानुज आचार्य यांच्या बैठकीच्या मुद्रेतील हा जगातील दुसरा सर्वात मोठा पुतळा आहे. राष्ट्रपती श्री रामनाथ कोविन्द (President Shri Ramnath Kovind) यांच्या हस्ते 13 फेब्रुवारी 2022 रोजी रामानुज पुतळ्याच्या अंतर्गत 120 किलो सुवर्णजडीत खोलीचे अनावरण करण्यात आले आहे. तर पंतप्रधानांच्या हस्ते 5 फेब्रुवारीला स्टॅच्यू ऑफ इक्वालिटीचे अनावरण करण्यात आले.

शमशाबाद, हैदराबाद, तेलंगणा येथे 45 एकर जागेवर हा स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी उभारण्यात आला आहे. हा 1000-कोटी रुपयांचा प्रकल्प जगभरातील भक्तांनी दिलेल्या दानावर बांधलेला आहे. श्री रामानुजाचार्याच्या गर्भगृहात 130 किलो सोन्याचा वापर करण्यात आला. बाहेरील 216 फूटी स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी (Statue of Equality) हा जगातील दुसरा सर्वाधिक उंच पुतळा असून तो बैठ्या मुद्रेत साकारलेला आहे. सोने, चांदी, तांबे, पितळ आणि झींक अशा पंचधातूनी ही मूर्ती घडवण्यात आली. बांधकामात 108 दिव्य देसमच्या प्रतिकृतीसह तामीळ संत अलवारस यांच्या कार्यात नमूद विष्णू मंदिराचे 108 नमुने कोरलेले आहेत.

हा पुतळा सोने, चांदी, तांबे, पितळ आणि जस्त यांच्या मिश्रणाने बनलेली ‘पंचधातू’ आहे. हा पुतळा 54 फूट उंच अश्या भद्रवेदी नामक इमारतीवर उभारला आहे. त्या इमारतीमध्ये डिजीटल वैदिक ग्रंथालय व संशोधन केंद्र, प्राचीन भारतीय लिखाण, नाट्यगृह, शैक्षणिक गॅलरी आहे. रामानुजाचार्य यांच्या पुतळ्याची कल्पना रामानुजाचार्य आश्रमाचे चिन्ना जीयार स्वामी यांची आहे.

धारुरच्या कारागीरांचे योगदान…
बीड (Beed) जिल्ह्यातील किल्ले धारूर (Dharur) येथील भाग्यश्री कंन्स्ट्रक्शनच्या सुमारे 250 ते 300 कारागीरांनी या सर्व परिसरातील 108 मंदिर, गर्भगृह, ग्रंथालय, संशोधन केंद्र, नाट्यगृह आदी सर्व इमारत बांधकाम केले आहे. यासाठीचे वीट बांधकाम, आरसीसी, प्लास्टर व सुशोभिकरणासारखे सर्वच काम 2016 पासून सलग सहा वर्षात या कारागीरांनी केले आहे. अतिशय उत्कृष्ट केलेल्या कामाबद्दल स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी व मंदिर संस्थानच्या वतीने दि.1 एप्रिल रोजी भाग्यश्री कंन्स्ट्रक्शनच्या बाळू सिरसट, संतोष सिरसट, शाम सिरसट, सनी सिरसट, संतोष घुमरे, निसार पठाण या कारागीरांचा सन्मान स्वामी श्री.चिनहा जी. आर. यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माय होम ग्रुपचे चेअरमन डॉ. रामेश्वर राव, व्हाईस चेअरमन साशिंदरजी यांची उपस्थिती होती.

( Dharur artisans honored in Telangana … Appreciation for the work done on the Statue of Equality and 108 temples. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!