चिंतेत भर…बीड जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट…

बीड दि.13 जूलै – बीड (Beed) जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या गेल्या काही दिवसात वाढत आहे. आज 4081 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 175 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3906 जण निगेटिव्ह आली आहेत. आज मंगळवारीही संख्येत मोठी वाढ झाल्याने चिंता वाढली आहे.
(Today’s corona update from Beed district …)
तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी….
बीड-46, अंबाजोगाई-2, आष्टी-28, धारुर-3, गेवराई-36, केज-12, माजलगाव-6, परळी-1, पाटोदा-20, शिरुर-15, वडवणी-6 अशी आहे.
बीड (Beed) जिल्ह्यात कोरोना बाधितांचा मंदावला वेग अधूनमधून वाढत आहे. दररोजच्या अहवालात नवीन बाधितांची संख्या शंभरीच्या आसपास स्थिरावलेली असताना अचानक वाढ दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसात बाधितांच्या आकड्यात वाढ झाली आहे. सोमवारी 157 तर आज 175 रुग्ण संख्या आहे.
दरम्यान, राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असतानाही अजून पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगलीमध्ये रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाहीये. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांचीही चिंता वाढत आहे. कोल्हापूरमध्ये हजार तर सांगलीमध्ये हजारच्या जवळपास दैनदिन रुग्ण आढळत आहेत.
राज्यात मागील चोवीस तासांमध्ये 8 हजार 535 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर आज 6 हजार 13 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत 59,12,479 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.02 टक्के इतके झाले आहे.