धारुर क्राईम… तक्रारदारांना पोलिसांची मारहाण; मयत तरुणाच्या अंत्यविधीनंतर खुनाचा संशय.

किल्लेधारूर दि.28 अॉगस्ट – धारुर (Dharur) तालुक्यातील भोपा येथील बाबूराव वाघचौरे व रामभाऊ वाघचौरे या दोन तक्रारदारांना दिंद्रुड पोलिसांनी (Police) बेदम मारहाण केल्याची घटना घडली. तर दुसरी घटना करेवाडी येथे काही दिवसांपुर्वी मयत झालेल्या तरुणाचा कुटूंबियांकडून त्याचा खुन (Murder) झाल्याचा संशय व्यक्त करत सिरसाळा पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.

(Dharur Crime … Complainants beaten by police; Suspicion of murder after funeral of deceased youth.)

याबाबत सविस्तर वृत्त असे की धारुर तालुक्यातील भोपा येथील बाबूराव वाघचौरे व रामभाऊ वाघचौरे हे दोघे गावात झालेल्या भांडणाची तक्रार देण्यासाठी दिंद्रुड पोलीस ठाण्यात गेले. तेथे त्यांची बाजू समजून घेण्याऐवजी विष्णू घोळवे व सुरेवाड या दोन कर्मचाऱ्यांनी त्यांना अरेरावी करत खोलीत कोंडले. त्यानंतर त्यांना बेदम मारहाण (Breathless beating) केली. हा प्रकार घडताच वाघचौरे यांनी वरिष्ठांकडे तक्रार करून या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, हा प्रकार समजताच शिवसेना (Shiv sena) जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी ठाण्यात धाव घेत दोन तास ठिय्या मांडला. मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जाधव यांनी केली आहे. या प्रकारा बाबत मात्र दिंद्रुड पोलिस ठाण्याच्या प्रभारी सहाय्यक पोलिस निरिक्षक (API) प्रभा पुंडगे यांनी याप्रकाराची माहिती नसल्याचे सांगत मारहाणीच्या तक्रारीनुसार चौकशी करुन कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया दिली.

करेवाडीच्या मयत तरुणाचा खुन केल्याची तक्रार …
या विषयी सविस्तर वृत्त असे कि, करेवाडी ता.धारुर येथील युवक बाळासाहेब सुखदेव कावळे वय 30 वर्षे, हा दि. 21 शनिवार रोजी रात्री 11 वाजताच्या दरम्यान मृत अवस्थेत आढळला. नैसर्गिक मृत्यू समजून कुटूंबियांनी सदरील मयत तरुणावर दुसऱ्या दिवशी अंत्यविधी उरकून घेतला.

पंरतू याबाबत कुटूंबियांना गावातून धक्कादायक माहिती समजली. मयत बाळासाहेबचे एका महिले सोबत अनैतिक संबध होते. त्या संशयीत महिलेच्या घरातून रात्री बाळासाहेब यास मृत अवस्थेत एका महिलेसह इतर तीन जणांनी बाहेर आणून टाकले असल्याची माहिती मिळाली. समजलेल्या गंभीर माहिती वरुन मयताचे नातेवाईकांनी घटना घडल्याच्या तीन चार दिवसांनंतर सिरसाळा पोलिस स्टेशन (Police station) येथे धाव घेत तसा जबाब नोंदवला. मात्र मयतावर अंत्यसंस्कार झाल्यामुळे पोलिसांसमोर तपासाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!