धारुर क्राईम न्यूज… खूनातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या; पोलिसांचा फिल्मी स्टाईल पाठलाग.

किल्लेधारूर दि.17 जुलै – धारुर (Dharur) तालुक्यातील कासारी येथील राहीबाई बालासाहेब बडे या महिलेच्या खून (Murder) प्रकरणातील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा (Local Crime Branch) बीड व दिंद्रुड पोलीसांच्या पथकाने शुक्रवारी फिल्मी स्टाईल पाठलाग करत जेरबंद केले. सदर आरोपीवर चार दखलपात्र गुन्हे (Interceptable Crime) असून गेल्या दोन वर्षांपासुन तो पोलिसांना गुंगारा देत होता.
(Dharur Crime News … The accused in the murder smiled; Police film style chase.)
दि.10 जुलै 2019 रोजी बालासाहेब व्यंकटी बडे व बबन ऊर्फ शाहूराज व्यंकटी बडे यांनी कासारी ता.धारुर येथील राहीबाई बालासाहेब बडे या महिलेस विष पाजून खून (Murder) केल्याची तक्रार मृत राहीबाईचा भाऊ राजेभाऊ बिबीशन तिडके यांनी दिली होती. या प्रकरणात गेल्या दोन वर्षांपासून आरोपी फरार होता. दि.16 शुक्रवार रोजी आरोपी बबन ऊर्फ शाहूराज व्यंकटी बडे यास गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा (Local Crime Branch) बीड व दिंद्रुड पोलीसांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी ताब्यात घेतले.
पोलिसांचा फिल्मी स्टाईल पाठलाग.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी (Police) आरोपीचा ठावठिकाणी धाव घेतली. पोलिसांना पाहताच शाहूराज बडे हा शेतातील चिखलातून जवळपास पाच किमी पोलिसांना गुंगारा देत पळत होता. तब्बल बारा पोलीस कर्मचारी त्याचा पाठलाग करीत होते, शेवटी त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलीस कर्मचाऱ्यांना यश आले.
या कारवाईत दिंद्रुड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे, पोलीस नाईक संजय मुंडे, संतोष बदने, पोलीस अंमलदार संतोष सरवदे, विष्णू घोळवे, आकाश जाधव, नवनाथ लटपटे, महिला पोलीस बाबई चोलेसह स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी पोलीस हेड एस. एम. उबाळे, पोलीस नाईक गायकवाड, कदम, आदींचा सहभाग होता.
आरोपीवर चार दखलपात्र गुन्हे.
शाहूराज (बबन) व्यंकटी बडे याच्यावर कासारी परिसरात चार दखलपात्र गुन्हे (Interceptable Crime) दाखल आहेत. गेल्या दोन वर्षांपासून आरोपी आपली राहती जागा सतत बदलत असल्यामुळे दिंद्रुड पोलिसांच्या (Police) नाकीनऊ आले होते. अखेर शुक्रवारी मोठ्या शिताफीने पोलिसांनी आरोपीला पकडले. त्याच्या अटकेनंतर कासारी ग्रामस्थांनी पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव केला.