धारुर क्राईम न्यूज… मोबाईलकरुन फसवणूक करत वैयक्तिक डाटासह तब्बल 1 लाख 38 हजार हडपले.

किल्लेधारूर दि.5 अॉगस्ट – एका ॲपचा वापर करुन जमा केलेले पेमेंट पेंडीग राहिल्यानंतर अनोळखी मोबाईल वरुन आलेल्या कॉलने वापरकर्त्याच्या वैयक्तिक डाटासह तब्बल 1 लाख 38,744 रुपयांची फसवणूक केल्याची घटना शहरात घडली. याप्रकरणी धारुर पोलिसात (Police) गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

(Dharur Crime News … Use the mobile app carefully … One lakh 38 thousand was seized along with personal data by cheating one.)

सध्या दिवसेंदिवस मोबाईलचा वापर वाढला आहे. अनेक सुविधा असल्यामुळे मोबाईल (Mobile) मध्ये वेगवेगळ्या ॲपचा सर्रास वापर होतो. बँकीची कामेही मोबाईलमुळे सोपी झाली असून शासनस्तरावरही ॲप वापरण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र यामुळे फसवणूकीचा धोकाही वाढला असून सतत अॉनलाईन फसवणूकीच्या (Online fraud) तक्रारी नोंदवल्या जात आहेत.

धारुर शहरातील लक्ष्मी नगर भागात राहणाऱ्या दत्ता ताराचंद अडाने या राधाकृष्ण नगर, लातूर येथील मुळ रहिवासी असणाऱ्या व्यक्तीची फसवणूक झाल्याची तक्रार धारुर पोलिसात नोंदवण्यात आली आहे. फिर्यादी अडाने हे नोकरदार असून CRED APP चा वापर करताना (SBI CREDIT CARD) क्रेडीट कार्डचे जमा केलेले पेमेंट जमा न होता पेंडिग राहिले होते. याचाच फायदा घेत आनोळखी आरोपीने CRED APP कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे भासवून 8756116181 या मोबाईल क्रमांकावरुन दोन वेळा फिर्यादीस फोन केला.

अडाने यांना SBI क्रेडीट कार्डचे जमा केलेले पेमेंट जमा करतो म्हणून वापरत असलेल्या ॲपचा ओटीपी व गुगल कोड हस्तगत केला. आरोपीने त्याआधारावर अडाने यांचा मोबाईल हॕक करत त्यांचा गुगल ड्राईव्ह आणि जीमेलवरचा डाटा चोरुन घेत CRED application मधून 90 हजार रुपयांचे कर्ज घेतले. तसेच क्रेडीट कार्डवरील 48 हजार 744 रुपये स्वतःच्या खात्यात वर्ग केले.

अडाने यांची 1 लाख 38,744 रुपयांची फसवणूक करत संपुर्ण माहिती चोरली. याप्रकरणी धारुर पोलिसात फसवणूकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिळालेल्या फसवणूक करणाऱ्याच्या मोबाईल क्रमांकावरुन सहाय्यक पोलिस निरिक्षक सुरेखा धस पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!