राज्य सरकारचा भोंग्याबाबत मोठा निर्णय; सर्वांसाठी महत्त्वाची बातमी… पहा काय आहे लाऊडस्पीकरचा नियम.

मुंबई दि.18 एप्रिल – गुढी पाडव्यादिवशी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या भोंग्याविषयीच्या वादग्रस्त विषयानंतर आता राज्य सरकारने गांभिर्याने दखल घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्देशाचे पालन करत सर्वच धार्मिक स्थळांवर भोंगा लावण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार असून दोन दिवसांत याबाबत राज्य सरकारकडून मार्गदर्शक सुचना (Guidelines) जाहिर करण्यात येणार आहेत.

राज्यात मागील काही दिवसापासून मशिदीवरील लाऊडस्पीकरवरून (loudspeakers) राजकारण चांगलेच तापलेले दिसत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 3 मे नंतर मशिदींतील लाऊडस्पीकर हटविण्याचा अल्टिमेटम दिला होता. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे गृहमंत्री (Home Minister) दिलिप वळसे पाटील (Dilil Walse Patil) आणि डीजीपी (DGP) यांच्यात आज महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यानंतर धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकर लावण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागेल, असा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत  गृहमंत्री वळसे पाटील व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्यात बैठक होवून दिड तास चर्चा झाली आहे. दोन दिवसांत मार्गदर्शक सुचना जाहिर होण्याची शक्यता आहे.

आता सर्वच धार्मिकस्थळांसाठी परवानगी आवश्यक.
3 मे नंतर मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याच्या राज ठाकरेंच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. आता सर्वच धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकर लावायचे असल्यास परवानगी घ्यावी लागेल, असे महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केले आहे. तसे न केल्यास प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जाईल. या संदर्भात महाराष्ट्र सरकारने आतापासून विनापरवाना लाऊडस्पीकर लावणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे निवेदन दिले आहे.

कायदा आणि नियम काय सांगतात?
केवळ मशिदीतच नाही, तर हिंदू, ख्रिश्चन अशा अन्य धर्मियांमध्येही वेगवेगळ्या सणांच्या वेळी तसंच उत्सव, लग्न, जत्रेत मोठ्या प्रमाणात लाऊड स्पीकरचा वापर होतो. भारतात लाऊडस्पीकरच्या वापराचे नियम आणि निर्बंध (restrictions) समान आहेत असं कायदेतज्ज्ञ सांगतात.

मुंबई उच्च न्यायालयाचे (Mumbai High Court) वकील आणि महाराष्ट्र-गोवा बार काऊन्सीलचे सदस्य उदय वारूंजीकर सांगतात,( ENVIRONMENTAL PROTECTION ACT 2000 )नुसार आवाजाचे नियम आहेत. धार्मिक स्थळांना यातून सूट आहे असं काही नमूद केलेलं नाही. केवळ राज्य सरकारकडे रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत लाऊडस्पीकर वापरण्यासाठी वर्षातून 15 दिवस सूट देण्याचे अधिकार असतात. उत्सव, सभा अशा काही कारणांसाठी सरकार परवानगी देऊ शकतं.”

ध्वनी प्रदूषणाचे नियम काय सांगतात?
भारतात लाऊडस्पीकरच्या वापराविषयीचे नियम 2000 साली लागू झाले. ( The Noise pollution (regulation and control) rules ) अर्थात ध्वनी प्रदूषण नियमन व नियंत्रण या नावानं ते ओळखले जातात. हेच नियम मशीद आणि इतर धार्मिक स्थळांनाही लागू होतात. या नियमांनुसार एखाद्या ठिकाणी लाऊडस्पीकर किंवा साऊंड सिस्टिम लिखित परवानगीशिवाय लावता येत नाही. बंदिस्त सभागृह, कॉन्फरन्स रुम किंवा आपत्कालीन परिस्थितीचा अपवाद वगळता रात्रीच्या वेळेस (रात्री 10 ते सकाळी 6) लाऊडस्पीकर लावता येत नाही.

काही सांस्कृतिक कार्यक्रम अथवा सणांच्या वेळेस राज्य सरकार रात्री 10 ते 12 वेळात लाऊडस्पीकरच्या वापराला परवानगी देऊ शकतं, पण ते दिवस आधीच जाहीर करावे लागतात. सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपकाच्या आवाजाची मर्यादा त्या ठिकाणच्या नेहमीच्या आवाजापेक्षा जास्तीतजास्त 10 डेसिबल वर तसंच 75 डेसिबलपेक्षा जास्त असू शकत नाही. खासगी जागेसाठी ही मर्यादा 5 डेसिबलची आहे.

वेगवेगळ्या ठिकाणी आवाजाची मर्यादा अशी आहे…
-औद्योगिक परिसरात दिवसा 75 डेसिबल आणि रात्री 70 डेसिबल (Decibels)
-व्यावसायिक परिसरात दिवसा 65 डेसिबल आणि रात्री 55 डेसिबल
-रहिवासी क्षेत्रात दिवसा 55 डेसिबल आणि रात्री 45 डेसिबल
-सायलेंस झोनमध्ये ( Silence zone) दिवसा 50 तर रात्री 40 डेसिबल (Decibels)

( Big decision of the state government regarding Bhongya; Attention to MNS ultimatum … see what is the rule of loudspeaker. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!