बीड जिल्ह्यात शनिवारी आढळले येवढे कोरोना बाधित…. पहा तालुका निहाय आकडेवारी.

बीड दि.31 जूलै – बीड (Beed) आज शनिवारी  जिल्हा प्रशासनाकडे 5012 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 198 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 4814 जण निगेटिव्ह आली आहेत.

(Todays corona update in Beed district …. see taluka wise numbers.)

तालुका निहाय आकडेवारी….
बीड-61, अंबाजोगाई-9, आष्टी-47, धारुर-6, गेवराई-18, केज-9, माजलगाव-2, परळी-0, पाटोदा-16, शिरुर-21, वडवणी-9 अशी आहे.

(आपल्या भागातील बातम्या तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घेण्यासाठी Beed24news च्या 9421944568 या क्रमांकाला आपल्या व्हॉटसॲप ग्रुपवर ॲड करा)

बीड (Beed) जिल्ह्यात चार तालुक्यात अहमदनगर जिल्ह्याच्या सिमेवर अँटीजन तपासणी नाके तयार करण्यात आली आहे. जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन व निर्बंधाची कडक अंमलबजावणी करण्याच्या सुचना प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी रात्री व्हिसीद्वारे प्रशासकीय यंत्रणांना दिली आहे. याप्रमाणे स्थानिक पातळीवर प्रशासकीय अधिकारी रस्त्यावर उतरल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्रात कोरोना परिस्थिती.
दरम्यान, महाराष्ट्रात शुक्रवारी 6 हजार 600 नव्या कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची नोंद झाली तर, 7 हजार 431 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील एकूण कोरोना रुग्णांपैकी 60 लाख 83 हजार 319 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 96.61 टक्के एवढा झाला आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची संख्या 62 लाख 96 हजार 756 एवढी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली असून, राज्यात सध्या 77 हजार 494 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रात 231 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर 1 लाख 32 हजार 566 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!