धारुरच्या पत्रकारांनी केला रास्ता रोको; रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी.

किल्ले धारूर दि.16 जुन – धारूर येथील पत्रकार दिगांबर शिराळे यांचे खामगाव पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर (National Haighway) मागील पंधरा दिवसापूर्वी अपघाती निधन झाले होते . या प्रकरणात दोषी असणाऱ्या संबंधित वाहनावर व रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यावर सदोष मनुष्य वधाचा तात्काळ गुन्हा नोंद करून कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी धारूर पत्रकार संघाच्या वतीने चोरांबा फाटा येथे गुरुवार दि. 16 रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले .
खामगाव – पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर बारा किमी अंतर रस्ता अरुंद असल्यामुळे मागील तीन वर्षात मोठ्या प्रमाणामध्ये अपघाताचे प्रमाण वाढले आहे . 1 जून रोजी धारूर येथील पत्रकार (Reporter) डिगांबर शिराळे यांचे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघाती निधन झाले होते. अपघात होऊन पंधरा दिवसाचा कालावधी उलटला तरी शिराळे यांच्या कुटुंबियांना कसल्या प्रकारचा न्याय मिळत नाही.
संबंधित वाहनावर गुन्हा दाखल करण्यात यावा व अरुंद रस्त्यामुळे अपघात झाला असून संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून रस्ता रुंदीकरण करण्यात यावे या मागणीचे निवेदन तहसिलदार व पोलीस स्टेशन (Police Station) धारूर यांना देवूनही दखल न दिल्याने धारूर पत्रकार संघाच्या वतीने दि. 16 जुन रोजी चोरांबा पाटी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले . यावेळी आंदोलनामध्ये पत्रकारांबरोबर चोरांबा ग्रामस्थांनी सहभाग घेवला. नायब तहसिलदार जी. बी. तापडीया यांनी पत्रकारांच्या मागण्याचे निवेदन स्विकारले.
( Dharur journalists staged Rasta Rocco agitation; Demand to register a case against the officer of Road Development Corporation.)