धारुर पोलिसांनी बलात्कारातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या; चार महिन्यांपासून होता फरार.

5 / 100

किल्ले धारूर दि.29 एप्रिल – धारुर पोलिसांनी (Police) आज दि.29 शुक्रवारी गुप्त माहितीच्या आधारे चार महिन्यापासून बलात्काराच्या (Rape) गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

( Dharur police nabbed the accused; He had been absconding for four months in a rape case. )

याबाबत सविस्तर वृत्त असे की, धारूर (Dharur) पोलीस ठाण्यात गु.र.न .1/22 कलम 363, 376 नूसार आरोपी बळीराम किसन मुंडे (वय 35 वर्ष) रा. काळूचीवाडी ता. केज या आरोपीवर बलात्काराचा गुन्हा (Crime of rape) नोंद आहे. मात्र चार महिन्यापासून सदर आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देवून गुंगारा देत होता. आज मात्र तब्बल चार महिन्यानंतर फरार आरोपी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.

आज दि.29 शुक्रवार धारूरचा आठवडी बाजाराचा दिवस. केज पोलीस स्टेशनचे सायबर विभागाचे (Cyber ​​Department) पोलीस नाईक अनिल मंदे यांना खबऱ्या मार्फत आरोपी धारुरच्या आठवडे बाजारात आल्याची गुप्त माहिती मिळाली. माहिती मिळताच मंदे यांनी धारूर येथील आठवडे बाजारात जावून आरोपीस ताब्यात घेतले. धारूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव, पीएसआय एल.एस. घोडे यांच्या सुपूर्द केले.

सदर कारवाई पोलीस उपअधीअक्षक पंकज कुमावत (ASP Pankaj Kumawat) यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर आरोपी संबंधीत फिर्यादीस वांरवांर धमक्या देत होता. मागील चार महिन्यापासून पोलिस आरोपीच्या शोधात होते. या गुन्ह्याचा तपास पिंक पथकाच्या (Pink squad) पोलीस उपनिरीक्षक (PSI) एस. के. कोळी या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

( Dharur police nabbed the accused; He had been absconding for four months in a rape case.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!