धारुर पोलिस देणार मुलींना आत्मसंरक्षणाचे धडे; महिला दिनांपासून पोलिसांचा स्तूत्य उपक्रम.

किल्ले धारूर दि.7 मार्च – धारूर येथील पोलीस स्टेशनच्या वतीने आत्मसंरक्षणासाठी (self-defense) महिला दिना पासून कराटे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात दहा वर्षांवरील जास्तीत जास्त मुलीनी सहभाग घ्यावा असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक विजय आटोळे यांनी केले आहे.

( Dharur police to give self-defense lessons to girls; Commendable activities of the police since Women’s Day. )

धारुर शहरातील दहा वर्ष वया पुढील मुली साठी पोलीस अधीक्षक बीड यांच्या संकल्पनेने आणि अपर पोलिस अधीक्षक, अंबाजोगाई/बीड आणि सहा. पोलीस अधिक्षक, केज यांचे मार्गदर्शना खाली 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिना (International Women’s Day) निमित्त मुलींना कराटे (Karate) व कायद्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

दि. 8 मार्च 2022 पासून सकाळी 7 ते 8 या वेळेत मुलींच्या सक्षमीकरण करण्यासाठी पोलीस स्टेशन धारुर (Dharur) येथील प्रांगणात पंधरा दिवसांसाठी दहा वर्षे वयापुढील मुलींसाठी कराटे प्रशिक्षण आयोजित केलेले आहे. कराटेचे प्रशिक्षण महिला पोलिस (Police) अमलदार यांचे निगराणीत होणार असून मुलीच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणार आहे.

सदर प्रशिक्षणा करिता प्रशिक्षकाची नेमणूक करण्यात येणार आहे. तरी सर्व पालकांना दि.8 मार्च 2022 रोजी पासून आपल्या पाल्यांना कराटे प्रशिक्षणासाठी पोलीस स्टेशन (Police Station) धारुर मध्ये पाठवावे असे आवाहन करत त्या दरम्यान पोलीस अधिकारी यांचे मार्फत मुलींना त्यांच्या साठी दिलेले कायद्याचे संरक्षण या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अशी माहिती धारूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक (Assistant Police Inspector) विजय आटोळे यांनी दिली आहे.

अलिकडे अल्पवयीन मुलींच्या शोषणाच्या घटना वाढल्या आहेत. बीड (Beed) जिल्ह्यातही अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना सतत घडत असून फुस लावून पळवून नेण्याच्या घटना तसेच रोड रोमियोच्या त्रासाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. पोलिसांनी दुरदृष्टीचा विचार करुन मुलींना सक्षम करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले असून या उपक्रमाचे कौतूक होत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!