धारुर परिसर… पीएसआय डोलारे यांच्या पाठोपाठ एपीआय सुरेखा धस यांची बदली;

किल्लेधारूर दि.27 अॉगस्ट – धारूर पोलीस ठाण्याच्या (Police Station) प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) सुरेखा धस यांची बीड येथे अनैतिक मानवी व्यवहार शाखेत बदली झाली असून रिक्त पोलीस निरीक्षक पदाचा पदभार बीड (Beed) शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन दगडू पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. गेल्याच आठवड्यात पीएसआय प्रदीप डोलारे यांची बदली झाली असून लगेच दुसऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याची बदली झाली आहे.
(Dharur Premises … Transfer of API Surekha Dhas following PSI Dolare;)
काही दिवसांपुर्वीच येथील कर्तव्यदक्ष पोलिस उपनिरिक्षक (PSI) प्रदिप डोलारे यांची जालना जिल्ह्यातील घनसांवगी येथे बदली झाली होती. त्यांच्या पाठोपाठ आता ठाणे प्रभारी सुरेखा धस यांच्या बदलीचे आदेश आले आहेत. दिड वर्षांपूर्वी सहायक पोलीस निरीक्षक सुरेखा धस यांची धारुर येथे नियुक्ती करण्यात आली होती. याच काळात कोरोनाने सर्वत्र थैमान घातले होते. धस यांची बीड येथे अनैतिक मानवी व्यवहार कक्षात बदली करण्यात आली आहे.
कोरोना काळात धस यांनी उत्कृष्टरित्या पोलिस ठाणे हद्दीतील व्यवस्थापन सांभाळले. त्यांचे चांगल्या कार्यामुळे त्या जनसामन्यात लोकप्रिय अधिकारी म्हणून नावलौकिक मिळवला होता. कायदा व सुव्यवस्था सांभाळत त्यांनी लोकांची कठीण काळात काळजी घेण्याचे काम केले. त्यांच्या जागी धारूर (Dharur) पोलिस ठाण्याचे रिक्त असलेल्या पोलीस निरीक्षक पदाचा पदभार शिवाजीनगर, बीड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन दगडू पाटील सांभाळणार आहेत.