धारुरमधील आजचे कोरोना रुग्ण… पहा किती अन कुठले आहेत रुग्ण

किल्लेधारूर दि.३(वार्ताहर)- येथील कोविड (covid-19) केअर सेंटरमध्ये आज ८ ॲन्टीजन (antigen) तपासणी करण्यात आल्या. यात ३ रुग्ण पॉझिटीव्ह (Positive) आढळली आहेत. तर येथून काल पाठवण्यात आलेली १६ स्वॅब अहवाल पैकी १ पॉझिटीव्ह आला आहे. आजची पॉझिटीव्ह (Positive) संख्या ४ आहे.
दोन दिवसांपुर्वी ॲन्टीजन तपासण्यात व स्वॅब (Swab) नमुन्यात अचानक ८ पॉझिटीव्ह आढळली होती. काल ३ तर आज पुन्हा ४ पॉझिटीव्ह (Positive) रुग्ण संख्या आले आहेत. आज केवळ ८ ॲन्टीजन चाचण्या झाल्या. यात ३ रुग्ण पॉझिटीव्ह (Positive) आढळली आहेत. तर कालची १६ स्वॅब (Swab) नमुने पैकी १ पॉझिटीव्ह आढळला आहे. आज ४ रुग्ण पॉझिटीव्ह (Positive) असून ८ जनांचे स्वॅब नमुने अंबाजोगाईला तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती कोविड (covid-19) केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तफील तांबोळी यांनी दिली.
ॲन्टीजन (Antigen)
१. ४० वर्षीय स्त्री, थेटेगव्हाण, ता. धारुर
२. ३६ वर्षीय पुरुष, अंजनडोह, ता. धारुर
३. ३० वर्षीय स्त्री, अंजनडोह, ता. धारुर
स्वॅब (Swab)
४. ३९ वर्षीय स्त्री, कसबा, धारुर
यांचा समावेश आहे.