Dharur Road Robbery.. धारुर घाटात लुटणारे दरोडेखोर जेरबंद ; एका आरोपीवर तब्बल 77 गुन्हे !

किल्लेधारुर दि.3 सप्टेंबर – Dharur Road Robbery.. काही दिवसांपूर्वी धारुर तालुक्यातील आसोला ते पिंपरवाडा घाटात Ghat चारचाकी आडवी लावून दुचाकीवरील दिर भावजई या दोघांना लुटणाऱ्या दरोडेखोरांना जेरबंद करण्यात बीड Beed स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. जेरबंद केलेल्या एका आरोपीवर तब्बल 77 गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ( Dharur Road Robbery.. Dharur Ghat robbers jailed; As many as 77 crimes against one accused!)
दि.22 अॉगस्ट रोजी तालुक्यातील पिंपरवाडा येथील श्रीकिसन कारभारी तिडके आपल्या भावजईसह गावाकडे जात असताना आसोला ते पिंपरवाडा घाटात स्कार्पिओ गाडी आडवी लावून मारहाण करत तिघांनी लुटल्याची Dharur Road Robbery.. घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास बीडच्या Beed स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता. पोलिस निरिक्षक संतोष साबळे यांना याप्रकरणातील आरोपींची खबर मिळताच तीन आरोपीना खंडेश्वरी मंदिराजवळ स्कार्पिओ गाडीसह ताब्यात घेतले. आरोपीनी गुन्ह्याची कबुली दिली असून यातील एका आरोपीवर तब्बल 77 गुन्हे असल्याची माहिती समोर आली. सदर कामगिरी पोलिस अधिक्षक Superintendent of Police नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलिस अधिक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक संतोष साबळे, पो. उपनिरिक्षक PSI श्रीराम खटावकर, सलीम शेख, मनोज वाघ, प्रसाद कदम, देविदास जमदाडे, विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, सचिन आंधळे, अश्विनकुमार सुरवसे, आशोक कदम यांनी केली. पोलिसांच्या Police कारवाईचे कौतूक होत आहे.