घात अपघात

धारुर – केज रस्त्यावर दुसरा अपघात; एक ठार, एक जखमी.

केज दि.23 मे – धारूर केज रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग (548 सी) वर रात्री धारुर शहरात एका शिक्षकाला अज्ञात वाहनाने उडवल्याची घटना घडल्यानंतर असाच अपघात राष्ट्रीय महामार्ग (548 डी) केज बीड रस्त्यावर काही वेळानंतर केज तालुक्यातील सारुळ पाटीवर अपघात होवून एक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे.

धारुर शहरात रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक या दरम्यान एका भरधाव वाहनाने पादचारी शिक्षक गणेश नागनाथ मिठेवाड (वय 40) यांना उडवल्याने ते जागीच ठार झाल्याची घटना घडली. सदर अपघाताच्या काही तासानंतर याच रस्त्यावर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत केज तालुक्यातील सारुळ पाटीवर दुचाकीवरील एक ठार तर एक जखमी झाल्याचे समोर आले आहे.

रविवारी रात्री अकराच्या सुमारास केजजवळ सारुळ फाट्यावर दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात छत्रभुज काशिद यांचा मृत्यू झाला तर मारोती भोसले हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर उपजिल्हा रुग्णालयात प्रथोउपचार करुन स्वा.रा.ती. अंबाजोगाई येथे हलवण्यात आले. दरम्यान, धडक देणारे अज्ञात वाहन येथूनही पसार झाले आहे.

धारुर शहरात शिक्षकाला चिरडून तर केजजवळ दुचाकीला धडक देवून अज्ञात वाहन पसार झाल्याचे साम्य घटनेत आहे. या दोन अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी आहे. दोन्ही अपघातातील धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा अद्याप पत्ता लागलेला नसून पोलिस त्या वाहनांचा शोध घेत आहे.

( Dharur – Second accident on Kaij Road; One killed, one injured. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!