धारुर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण संख्या; कोविड सेंटरची संख्या वाढवली.

किल्लेधारूर दि.21 एप्रिल – जिल्ह्यात सध्या कोरोना विषाणू (Corona Virus) संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लोकसंख्येच्या तुलनेने कमी असलेल्या धारुर तालुक्यात कोरोना विषाणू संसर्ग प्रमाणापेक्षा अधिक आहे. येथील 160 क्षमतेची दोन्ही कोविड केअर सेंटर (Covid care center) पुर्ण भरली असून आज या दोन्ही ठिकाणी 187 कोरोना बाधित (Corona Positive) उपचार घेत आहेत. ही गेल्यावर्षीपासूनची सर्वाधिक संख्या आहे.

(Dharur taluka has the highest number of patients; Increased the number of covid centers.)

देशभर सध्या कोरोनाची दुसऱ्या लाटेचा थरार दिसत आहे. यंदा महाराष्ट्रात याची तीव्रता अधिक आहे. राज्यात कोरोना संसर्ग (Corona Virus) वाढल्यामुळे सध्या आणिबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तालुकानिहाय आकडेवारी समोर येत आहे. बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हजारावर कोरोना बाधित आढळत असल्याने अनेक कोविड केअर सेंटर (Covid care center) फुल्ल झाली आहेत. खाजगी कोविड केअर सेंटरमध्येही हिच परिस्थिती असून खाटा नसल्याचे दिसत आहेत.

धारुर तालुक्यात सध्या (दि.20 एप्रिल पर्यंत) 315 ॲक्टीव रुग्ण (Active patients) आहेत. यापैकी 187 जणांवर येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. काल 11 जणांना सुट्टी देण्यात आली तर 21 नवीन रुग्णांची भरती करण्यात आली. यात लक्षणे नसणाऱ्या 25 जणांना गृह विलगीकरणाचा सल्ला देण्यात आला असल्याची माहिती डॉ.आमोल दुबे यांनी दिली. एकुण परिस्थिती पाहता प्रशासनाने आणखी नवीन 100 खाटांची परवानगी दिली असून सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांची व्यवस्था कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय या नवीन कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती कोविड केअर सेंटरचे समन्वयक डॉ. चेतन आदमाने यांनी दिली.

तालुक्यात दि.20 एप्रिल पर्यंत 1503 कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 30 जणांचा मृत्यू झाला आहे. तालुक्याचा पॉझिटीव्हीटी रेट 7.0 टक्के तर मृत्यू दर 2.0 टक्के आहे. तालुक्यात एकुण 16542 जणांची कोविड-19 तपासणी करण्यात आली आहे. यातील 6308 जणांची आरटीपिसीआर तर 10 हजार 264 ॲन्टीजन तपासणी करण्यात आलेली आहे. यापैकी 1503 पॉझिटीव्ह तर 15 हजार 69 निगेटिव्ह आली आहेत. तर तालुक्यात 315 ॲक्टीव रुग्ण (Active patients) असल्याची माहिती तालुका आरोग्य कार्यालयातून मिळाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!