आज ठरणार धारुर बाजार समितीचा सभापती; यांची लागणार लॉटरी.

किल्लेधारूर दि.12 जुलै – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (market committee) रिक्त झालेल्या सभापती पदावर आगामी आठ महिन्यांसाठी कारभारी निवडला जात आहे. यासाठी आज दि.12 जुलै सोमवार रोजी दुपारी एक वाजता बैठक होत आहे. बहुमतात असलेल्या भाजपात इच्छूकांची संख्या वाढल्यामुळे सभापती कोण होणार याची उत्सूकता शिगेला पोहोचली आहे.
(Dharur will be the chairman of the market committee today; Curiosity shrieked.)
भाजपाचे (BJP) बहुमत असलेल्या बाजार समितीमध्ये सभापती पदासाठी इच्छुकांची संख्या वाढल्याने फोडाफोडीचा दगाफटका टाळण्यासाठी भाजपाचे (BJP) संचालक दोन गटात सहलीवर पाठवले आहेत. सभापती (chairman) पदासाठी विविध नावे चर्चेत असली तरी विद्यमान उपसभापती सुनील शिनगारे व माजी उपसभापती महादेव तोंडे यांची नावे चर्चेत आघाडीवर आहेत. मात्र, ऐनवेळी नेमकी कोणाची वर्णी लागणार, की तिसरेच नाव पुढे येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नऊ महिन्यांवर पंचवार्षिक निवडणूक.
विद्यमान संचालक मंडळाची मुदत 17 एप्रिल 2022 रोजी संपते. मात्र, सभापती महादेव बडे यांच्या निधनामुळे येथील सभापती (chairman) पद रिक्त झाले आहे. अवघ्या आठ महिन्यांच्या कार्यकाळासाठी सभापतीची निवड होत असून, संचालकांची बैठक पिठासिन अधिकारी आर.एम. मोटे यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी 1 वाजता बोलवण्यात आली आहे. यावेळी सहाय्यक पिठासिन अधिकारी म्हणून शिवराज नेहरकर काम पाहणार आहेत.
भाजपाचे संचालक सहलीवर.
भाजपाचे बहुमत असलेल्या बाजार समितीत (market committee) भाजपाचे दहा, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सात संचालक आहेत. भाजपाच्या ताब्यात ही संस्था आहे. भाजपाचे रमेशराव आडसकर (Ramesh Adaskar) व राजाभाऊ मुंडे यांना मानणारे संचालक वर्ग असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) भाजपाच्या संचालकांत दुफळी होण्यासाठी लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे दोन्ही गटांनी आपापले संचालक चार दिवसांपूर्वी सहलीवर पाठवले आहेत.
सभापती पदासाठी भाजपाकडून उपसभापती सुनील शिनगारे, माजी उपसभापती महादेव तोंडे, बालासाहेब जाधव व ॲड. नवनाथ पांचाळ यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, यात सुनील शिनगारे व महादेव तोंडे यांची नावे आघाडीवर घेतली जात आहेत. त्यामुळे या दोघांपैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज सोमवारी होणाऱ्या सभापती पदाच्या या निवडीत ऐन वेळी काही राजकारण घडून तिसरेच नाव समोर येते की काय, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
आ.प्रकाशदादा सोळंके यांचा वेट ॲन्ड वॉच…
आज होत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Dharur Agricultural Produce Market Committee) सभापती निवडीवर आ.प्रकाशदादा सोळंके (Prakash Solanke) लक्ष देवून आहेत. आज सकाळीच आ. सोळंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संचालकांना एकत्रित बैठक आयोजित केली आहे. भाजपातील दुफळीचा फायदा घेवून बाजार समितीवर पुन्हा ताबा मिळविण्यासाठी आ.सोळंके (Prakash Solanke) वेट ॲन्ड वॉचमध्ये आहेत.