धारुर प्रिमियम लिग मैत्री संघाने पटकावला… सिनियर फायटर उपविजेता…

किल्लेधारूर दि.६(वार्ताहर) शहरात खेळल्या गेलेल्या धारुर प्रिमियम लिग (DPL) क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मैत्री संघाने सिनियर फायटर संघाचा दणदणीत पराभव करत चषक पटकावला. आजच्या अंतिम सामन्यासाठी प्रेक्षकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला.

येथील चारका मैदानावर जयहिंद (Jayhind) आयोजित धारुर प्रिमियर लिग (DPL) चषक स्पर्धा पार पडल्या. आज दि.६ शनिवार रोजी मैत्री क्रिकेट व सिनियर फायटर संघात अंतिम सामना खेळण्यात आला. यावेळी मैदान प्रेक्षकाने खचाखच भरले होते. दहा षटकाच्या या सामन्यात नाणेफेक जिंकून सिनियर फायटर या संघाने ७५ धावांचे लक्ष्य मैत्री संघाला दिले. एसएफ संघाकडून जूनेद कादरी व विरेंद्र अवस्थी यांनी चांगली फलंदाजी केली. मैत्री संघाने निर्धारित लक्ष्य केवळ ७.३ षटकात ७ गडी राखून गाठले व डिपीएल (DPL) चषकावर आपले नाव कोरले. मैत्री संघाकडून उत्कृष्ट गोलंदाजी करत ४ गडी टिपणाऱ्या शेख वाजेद याला मेन अॉफ दि मॕच घोषित करण्यात आले. मैत्री संघाच्या अनूप दिख्खत व मुन्ना तांबोळी यांनी चांगली फलंदाजी केली. या सामन्यासाठी पंच म्हणून बंडू फावडे व संतोष सद्दीवाल यांनी काम पाहिले.

क्रिकेट (Cricket) रसिकांसाठी पर्वणी ठरणाऱ्या या स्पर्धेचा आज अंतिम सामन्यात प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद होता. खचाखच भरलेल्या मैदानात सामना संपल्यावर बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंची समितीमार्फत निवड होवून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. या स्पर्धेत षटकार ओढण्याचा आजवरचा इतिहास मोडित निघाला असून तब्बल २७० षटकार वेगवेगळ्या खेळाडूंनी मारले. सतत तीन षटकार व तीन विकेट फटकारण्याचा विक्रम झाला. एकुण ९ खेळाडूंनी सतत तीन षटकार व तीन बळी घेण्याच्या डिस्कव्हरी कॉम्प्यूटर्स कप पटकावले. स्पर्धेचा यशस्वी खेळाडू म्हणून मेन अॉफ दि सिरिज चा पुरस्कार जूनेद कादरी याने पटकावला. बेस्ट बॕट्समन म्हणून रिंकू भोसले, बेस्ट बॉलर म्हणून आदर्श शुक्ला, बेस्ट फिल्डर म्हणून शेख इब्राहिम तर बेस्ट किपर म्हणून विकास गायसमुद्रे यांनी पारितोषिक पटकावले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जयहिंद (Jayhind) क्रिकेट (Cricket) क्लबच्या खेळाडूनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!