माझं गाव

धारुरचे एपीआय पालवे बीड पेठ पोलिस ठाण्यात रुजू; धारुर पोलिसांचा निरोप.

किल्लेधारूर दि.30 अॉक्टोंबर – धारूर पोलीस स्टेशन (Police Station) मधील सहाय्यक पोलीस निरीक्षक केदारनाथ पालवे यांची बदली बीड पेठ पोलीस स्टेशनला प्रभारी पोलीस निरीक्षक (Police Inspector) म्हणून बदली झाली असून त्यांना धारुर (Dharur) पोलिस स्टेशनच्या वतीने निरोप देण्यात आला. त्यांनी नुकताच बीड (Beed) पेठ पोलिस ठाण्याचा कार्यभार सांभाळला आहे.

(Dharur’s API Palve joins Beed Peth police station; Farewell to Dharur police.)

2011 च्या बॕचचे स.पो.नि. केदारनाथ पालवे धारूर येथील पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक (Assistant Police Inspector) पदी जून 2019 पासून कार्यरत होते. केदारनाथ पालवे यांची बदली बीड पेठ पोलीस स्टेशनला प्रभारी पोलीस निरीक्षक पदावर झाली असून एक शांत व संयमी अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. अतिशय कर्तबगार व गुन्ह्याचा उकल करण्यात त्यांचा हातकंडा आहे.

एपीआय (API) पालवे यांची बदली झाल्यामुळे धारूर पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांना निरोप देण्यात आला. या निरोप कार्यक्रमात बोलताना पालवे यांनी धारुर पोलिस हद्दीत काम करत असताना सहकारी व नागरिकांनी मोठे सहकार्य केले असून या भागातील नागरीकांनी मोठे प्रेम दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी धारुर ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव, ए.एस.आय. गोंविद बास्टे, पो.कॉ. मिसाळ, पो. कॉ. शिंदे व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!