शैक्षणिक

धारूरची गितांजली काकडे झाली सिए; चार वर्षांच्या परिश्रमानंतर मिळाले यश.

किल्लेधारूर दि.11 फेब्रुवारी – धारुर शहरातील विद्यार्थीनी गीतांजली काकडे हिने चार्टर्ड अकाऊंटंट (सि.ए.) परिक्षेत यश मिळवले. तिच्या या यशामुळे शहरातून तिचे कौतूक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

( Dharur’s Gitanjali became Kakade Si; Success after four years of hard work. )

शहरातील उदयनगर भागातील रहिवासी व कृषी सेवा केंद्रचालक महात्मा काकडे यांची कन्या गितांजली हिने बीबीए ( BBA ) पर्यंत शिक्षण पुर्ण केले. यानंतर तिने सिए ( Chartered Accountant ) होण्यासाठी पुणे येथे वस्तिगृहात राहून सलग तीन वर्ष अभ्यास करत यश मिळवले.

काल दि.10 रोजी आयसीएआयने ( ICAI ) डिसेंबर महिन्यात घेतलेल्या परिक्षांचा निकाल जाहिर झाला. यात गितांजली काकडे हिने 422 गुण मिळवले. गितांजली काकडे हिने बीबीएपर्यंत शिक्षण पुर्ण केले असू सि.ए. (CA) होण्याचे ध्येय पुर्ण करण्यासाठी पुणे येथे राहून सलग तीन वर्ष प्रयत्न केले.

गितांजली काकडे हिचं प्राथमिक ते उच्चमाध्यमिक शिक्षण धारुर ( Dharur ) शहरातच झालं आहे. माध्यमिक शिक्षण हुतात्मा पापासिंह विद्यालयात व उच्च माध्यमिक शिक्षण कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय धारुर येथे पुर्ण झालं. तिच्या या यशामुळे शहरातून तिचे अभिनंदन होत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!