धारुरची रुग्ण संख्या ५०० च्या उंबरठ्यावर… आजची पॉझिटीव्ह संख्या…. पहा कुठले आहेत रुग्ण….

किल्लेधारूर दि.२८(वार्ताहर) धारुर तालुक्यातील कोरोना (Corona) बाधितांची संख्या ४९६ झाली असुन आज तालुक्यात पॉझिटीव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या ३ असून काल पाठवलेली ७ स्वॅब (swab) पैकी ६ निगेटिव्ह तर एक पॉझिटीव्ह आली आहेत. तर २६ ॲन्टीजन (Anigen) तपासणीत आज २ जन कोविड (Covid-19) पॉझिटीव्ह आढळून आली आहेत. यात शहरातील २ तर पहाडी पारगाव येथील एकाचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून बाधितांचा वेग मंदावला असल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे.
३१ जूलैपर्यंत १७ कोरोना बाधित असलेली तालुक्याची संख्या आज मात्र ५०० चा आकडा ओलांडत आहे. तालुक्यात १५ मृत्यू कोरोना बाधितांचे असून मृत्यू दर ३ टक्के आहे. २६ ॲन्टीजन (Anigen) चाचणीत आज २ जन कोरोना (Corona) पॉझिटीव्ह आढळून आली आहेत. काल येथील कोविड (Covid-19) सेंटर मधून ७ स्वॅब (swab) नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आली होती. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून सर्व एक पॉझिटीव्ह आला आहे. आज आढळून आलेल्या ॲन्टीजन (Anigen) चाचणीत शहरातील संख्या दोन तर स्वॅब (swab) नमुन्यात ग्रामीण भागातील पहाडी पारगाव येथील एकाचा समावेश आहे.
ॲन्टीजन (Anigen) चाचणीतील कोरोना (Corona) पॉझिटीव्ह
१. ७ वर्षीय मुलगी, कटघरपुरा, धारुर
२. १६ वर्षीय मुलगी, उदयनगर, धारुर.
स्वॅब (swab) नमुन्यातील पॉझिटीव्ह
३. ६५ वर्षीय पुरुष, पहाडी पारगाव, ता.धारुर
यांचा समावेश आहे.