धारुरच्या कार्यालयाला मिळाले राज्यातील पहिले आयएसओ मानांकन…

किल्लेधारूर दि.९(वार्ताहर) धारूर येथील वनपरिक्षेत्र कार्यालय (Forest Office) येथील अधिकारी व कर्मचारी याचे एकजूटीने केलेल्या कामा मुळे राज्यातील आय. एस. ओ. (ISO) मानाकंन प्रमाणपत्र मिळवणारे राज्यातील पहिले कार्यालय ठरले असून या कार्यालयाचा चेहरा मोहरा बदलला आहे. या कार्यालयास नुकतेस हे आय.एस. ओ. मानाकंन प्रमाणपत्र देऊन या कार्यालयाचा गौरव करण्यात आला.
धारूर (Dharur) येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी कोरोना लाॕकडाऊन नंतर एकत्र येऊन एकजूटीने कार्यालयाचा चेहरा मोहरा बदलला. या कठीण काळाचा सदुपयोग केला. या मेहनतीचे फळ म्हणून हे तालूका वन कार्यालय (Forest Office) राज्यातले पहिले आय एस ओ (ISO) मानांकन प्राप्त करणारे कार्यालय ठरले. या कार्यालयास प्रमाणपत्र देऊन गौरवण्याचा सोहळा नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमास विभागीय वनअधिकारी एम. बी. तेलंग, नायब तहसीलदार प्रकाश गोपड, आय एस ओ समन्वयक प्रा. प्रशांत जोशी, अमोल कांबळे, परळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी भगवान गिते, धारूरचे (Dharur) वनपरिक्षेत्र अधिकारी एम एस मुंडे, वन परिमंडळ अधिकारी एम. एस. बहीरवाल, शंकर वरवटे वनपाल कस्तूरे हे उपस्थीत होते. यावेळी बोलताना प्रशांत जोशी यांनी कार्यालयातील बांधील की जपली तर कार्यालय आदर्श बनते याचे उदाहरण धारूर येथील वनपरिक्षेत्र कार्यालय असून एकजूटीचे हे यश आहे. आता दैंनदीन कामात फरक जानवेल असा विश्वास व्यक्त करत आय एस ओ मुल्याकंन करण्याची पध्दत सांगीतली. तर यावेळी मार्गदर्शन करताना विभागीय वन अधिकारी एम. बी. तेलंग यांनी हे वनपरिक्षेत्र कार्यालय दुर्गम भागातील असताना राज्यात पहिले तालूकास्तरीय कार्यालय आय एस ओ मानाकंन होण्याचा मान मिळवला हे कौतूकास्पद असून चांगल्या कामा साठी आवश्यक गोष्टी ची पुर्तता केली पाहीजे नियोजन केले तर विचार करण्याची गरज नाही पडत चांगल्या कामाच समाधान वाटतं व शिस्त येते. प्रेमानं गोड बोललं तर कुठल्या परिस्थितीत जिंकता येत. असे त्यांनी सांगितले. नायब तहसीलदार प्रकाश गोपड कौतूक मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनपरिक्षेत्र अधिकारी एम.बी. मुंडे यांनी तर अभार वन परिमंडळ अधिकारी शंकर वरवटे यांनी केले. यावेळी सर्व कर्मचारी उपस्थित होते.