नोटा बंद करण्याच्या बाबतीत आरबीआय कडून स्पष्टीकरण

दिल्लीः दि.२५-गेल्या काही दिवसांपासून १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद होणार असल्याचे वृत्त झळकत होते. याबाबत आरबीआयने (RBI) महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. सोशल मीडियावर (Social Media) देखील अशा बातम्यांचे अनेक स्क्रिनशॉट्स, मेसेज आणि पोस्ट व्हायरल झालेले दिसले. शेवटी या सगळ्या प्रकरणाची दखल घेत भारत सरकारच्या पत्रसूचना विभागाने (पीआयबी PIB) या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

‘आरबीआयकडून मार्च २०२१ पासून १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्यात येणार आहेत, असा दावा वृत्तामध्ये केला जात आहे, मात्र अद्याप कोणतेही अधिकृत विधान प्रसिद्ध झाले नाही. या वृत्तांमध्ये कोणतेही तथ्य नाही,’ असे पीआयबीकडून (PIB) सांगण्यात आले आहे.
याशिवाय, ‘आरबीआयकडून (RBI) या संदर्भातील कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही’ असेही पीआयबीने आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे असिस्टंट जनरल मॅनेजर बी महेश यांनी स्पष्ट केले आहे. ‘पीआयबी फॅक्ट चेक’ या ट्विटर अकाउंट च्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. सोशल मिडियावर (Social Media) व्हायरल होणाऱ्या या नोटाबाबतच्या खोट्या बातम्यांसंदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी पीआयबीने ‘पीआयबी फॅक्ट चेक’ या नावाने एक ट्विटर अकाऊंट सुरु केलं आहे. या अकाऊंटवरुन सोशल मिडियीवर व्हायरल होणाऱ्या बातम्यांची सत्यता पडताळून स्पष्टीकरण दिले जाते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे असिस्टंट जनरल मॅनेजर बी महेश यांनी एका कार्यक्रमात सांगितले की मार्च-एप्रिलनंतर या सर्व जुन्या नोटा चालु राहणार आहेत. ते म्हणाले की, ‘आरबीआय जुन्या चलनातील १००, १० आणि ५ रुपयांच्या नोटा हळूहळू काढून टाकेल. पण, अद्याप कोणतेही अधिकृत विधान या नोटांबाबत प्रसिद्ध झालेले नाही, म्हणून घाबरून जाण्याची गरज नाही. जुन्या चलनातील नोटा मागे घेणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे.’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!