धारुरच्या या प्रश्नावर विधिमंडळात लक्षवेधी; आमदार सोळंकेंची पर्यटनमंत्र्यांकडे मागणी.

किल्ले धारूर दि.22 मार्च – माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) मतदारसंघातील विविध प्रश्नांवर लक्षवेधी उपस्थित केली असून धारुर शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या विषयांचा यात समावेश आहे.

सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात माजलगावचे (Majalgoan) आमदार प्रकाशदादा सोळंके (MLA Prakash Solanke) चांगलेच चर्चेत आलेले आहेत. आ. सोळंके हे अधिवेशनात आपल्या अभ्यासपुर्ण भाषणासह प्रसंगी सरकारवर ताशेरे ओढून थेट नाराजी दाखवल्याचेही पहायला मिळाले. काल (दि.21) सोमवारी आ. सोळंके यांनी माजलगाव मतदारसंघातील अनेक प्रश्नावर लक्ष वेधून शासनाला ठोस निर्णय घेवून प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली.

माजलगाव मतदारसंघातील धरणांच्या प्रश्नावर बोलताना मोठ्या प्रमाणात असलेल्या जलाशयाला पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याची मागणी पर्यटनविकास मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याकडे केली. यात प्रामुख्याने माजलगाव धरण व धारुर तालुक्यातील अरणवाडी धरणाचा उल्लेख आ. सोळंके यांनी केला. यामुळे धारुर (Dharur) शहराच्या पायथ्याशी असलेल्या अरणवाडी धरणाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होण्याची अपेक्षा उंचावली आहे.

धारुर शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या धारूर (Dharur) वडवणी व आडसहून जाणाऱ्या पाडळसिंगी ते लोंखडी सावरगाव राज्य रस्ता क्रमांक 232 या रस्त्याचे काम तात्काळ व्हावे यासाठी आ. सोळंके यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला. या कामाला प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे. एकुण 65 कि.मी. रस्त्याचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून निधी उपलब्ध झाला आहे.

धारूर (Dharur) वडवणी व आडसहून जाणाऱ्या पाडळसिंगी ते लोंखडी सावरगाव या रस्त्याची अद्याप निविदा निघाली नसल्याने तात्काळ निविदा काढण्याची मागणी आ. सोळंके यांनी विधिमंडळ सभागृहात केली. तसेच माजलगाव तालुक्यातील गोदावरी नदीलगत असलेल्या अनेक पुरातन मंदिराचे जतन व दुरुस्ती करुन पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याच्या  मागणीसह शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न व खाजगी इंग्रजी शाळांच्या प्रश्नावर आ. सोळंके यांनी लक्षवेधी मांडली.

( Dharur’s question in the legislature; MLA Solanke’s demand to Tourism Minister. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!