माझं गाव

धारुरच्या युवकाची आकाशाला गवसणी ; बनला पहिला कमर्शियल पायलट.

41 / 100

किल्लेधारूर दि.18 अॉगस्ट – धारुरच्या युवकाने आकाशाला गवसणी घातली असून शहरातील पहिला कमर्शियल पायलट होण्याचा मान मिळवला आहे. शंतनू धनंजय भावठाणकर असे युवकाचे नाव असून त्याचे स्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
( Dharur’s youth leaps to the sky; Became the first commercial pilot. )

धारुर (Dharur) शहरातील सराफ व्यवसायिक धनंजय भावठाणकर यांचा मुलगा शंतनू या युवकाने दि.17 अॉगस्ट बुधवारी अमेरिकेत पाइपर वोरिएर (Piper Warrior) या विमानात मी प्रथमच उड्डाण केले. शंतनू याच्या पहिल्या यशस्वी उड्डाणानंतर त्याचे कौतूक होत आहे. शंतनूचे चौथीपर्यंतचे शिक्षण धारुर येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत तर माध्यमिक शिक्षण लातूर येथील सरस्वती विद्यालय व नेवासा येथील घाडगे पाटील विद्यालयात झाले. सिंहगड विद्यालयातून बारावीचे शिक्षण पुर्ण केले. बारावी शिक्षणानंतर आपले पायलट होण्याचे स्वप्न उराशी बाळगून शंतनू भावठाणकर याने औरंगाबाद येथील एमआयटी महाविद्यालयातून प्लास्टिक अँन्ड पॉलिमर इंजिनियरींगची पदवी घेतली.

यानंतर मुंबई येथील एअरलाईन प्रिप्रेशन स्कुल मधून डिजिसीए (DGCA) ची अवघड परिक्षा पास केली. या यशानंतर भावठाणकर याला अमेरिकेत 2 fly Airborne Florida America या पायलट स्कूल मध्ये प्रवेश मिळाला. दि.17 रोजी शंतनू भावठाणकर याने आपलं प्रशिक्षण पुर्ण करुन प्रथमच पाइपर वोरिएर (Piper Warrior) या विमानातून आकाशात झेप घेतली. त्याच्या या यशामुळे शंतनू हा शहरातील पहिला व्यवसायिक वैमानिक (commercial pilot) ठरला असून त्याचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. यावेळी बोलताना पायलट शंतनू भावठाणकर याने बोईंग 777 (Boeing 777) हे विमान चालवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याशिवाय मला फोटोग्राफी, बाईक रायडींग व ट्रेकिंग हे छंद असल्याचे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!