माझं गाव

धारुरचे तरुण पत्रकार दिगंबर शिराळे यांचे निधन; अज्ञात वाहनाची धडक.

किल्ले धारूर दि.2 जून – धारुर तालुक्यातील चोरंबा येथील तरुण पत्रकार दिगंबर यशवंत शिराळे (वय 27 वर्ष) यांचे बुधवारी रात्री अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेमुळे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर चोरांबा येथे अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, पत्रकार दिगंबर यशवंत शिराळे हे थेटेगव्हान हुन चोरंबा गावाकडे मोटरसायकलवर (क्र. एम. एच. 44 वाय. 3376) येत असताना अज्ञात वाहनाने बुधवारी सायंकाळी 9 च्या सुमारास धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना धारुर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करुन अंबेजोगाई रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र जात असतानाच त्यांचे निधन झाले.

या तरुण पत्रकाराच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. धडक देऊन संबंधीत वाहन या ठिकाणाहून गायब झाले आहे. याचा शोध पोलिसांनी लावावा अशीही मागणी नागरिकातून होत आहे. गुरूवारी सकाळी दिंगबर शिराळे यांचे पार्थीहा वर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. काही दिवसांपुर्वीच शिराळे यांना कन्यारत्न झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी व लहान मुलगी आहे. सदर अज्ञात वाहनाचा पोलिसांनी तात्काळ शोध लावण्याची पत्रकारांनी पोलिसांकडे मागणी केली आहे.

( Digambar Shirale, a young journalist from Dharur dies; Unknown vehicle crash. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!