धक्कादायक … न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना महिलेने मागितली पाच कोटींची खंडणी; मुंबईत खंडणीचा गुन्हा नोंद.

मुंबई दि.21 एप्रिल – महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना एका महिलेने पाच कोटी रूपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी खुद धनंजय मुंडे यांच्या तक्रारीवरुन मलबार हिल पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल (Ransom case) करण्यात आला आहे.

सामाजिक न्यायमंत्री (Social Justice Minister) धनंजय मुंडे यांना एका महिलेने पाच कोटी रूपयांची खंडणी मागितली असून हे पैसे न दिल्यास बलात्काराची तक्रार करण्याची धमकी दिल्याचा आरोपही धनंजय मुंडे यांनी या महिलेविरोधात आपल्या तक्रारीत केला आहे. मुंबईच्या मलबार हिल (Malabar Hill) पोलीस स्थानकात (Police Station) याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण सध्या क्राईम ब्रांचला (Crime Branch) वर्ग करून तपासाला देण्यात आलंय. क्राईम ब्रांच पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, खंडणी मागणारी महिला ही आपल्या परिचयातील असल्याचे धनंजय मुंडे यांनी आपल्या फिर्यादीत (Complaint) नमूद केले आहे. या फिर्यादीनुसार संबंधीत महिलेने फेब्रुवारी ते मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन केला होता. या प्रसंगी झालेल्या वार्तालापात त्या महिलेने पाच कोटी रूपये आणि महागड्या मोबाईलची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण न केल्यास सोशल मीडियावर (Social media) बदनामी करण्याची धमकी त्यांना देण्यात आली होती.

मुंडे यांनी या धमकीनंतर ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून 3 लाख रुपये आणि महागडा मोबाईलही कुरियरद्वारे पाठवला होता. मात्र तरीही महिला आणखी 5 कोटींच्या ऐवजाची मागणी करत होती. त्यामुळे धनंजय मुंडेंनी अखेर पोलीसात (Police) धाव घेतली असून त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार खंडणीचा गुन्हा दाखल (Filed a ransom charge) करण्यात आला असून गुन्हे शाखेकडून तपास सुरु आहे.

( Shocking … Woman demands Rs 5 crore ransom from Justice Minister Dhananjay Munde; Ransom case registered in Mumbai. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!