डॉ.प्रीतम मुंडे समर्थकात नाराजीचा सुर… महाराष्ट्राला मिळाली महत्वाची खाती.

मुंबई, 08 जुलै – केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) विस्तार झाल्यानंतर याचे पडसाद महाराष्ट्रात दिसत आहेत. राज्यातून 4 जणांना मंत्रिपद बहाल करण्यात आले आहे. परंतु, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या कन्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची बहिण खासदार डॉ. प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्मुळे मुंडे समर्थकात नाराजीचा सुर निघत आहे. ‘ही तर फक्त सुरुवात आहे..’असं म्हणत समर्थकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. दरम्यान रात्री झालेल्या खातेवाटपात महाराष्ट्राच्या वाट्याला महत्वाची खाती आली आहेत.
(Dissatisfaction with Dr. Pritam Munde’s supporters … Maharashtra got important accounts.)
काल केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) बहुप्रतिक्षीत विस्तार करण्यात आला. या मंत्रिमंडळ विस्तारात डॉ. प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यांच्या नावाची जोरदार चर्चा असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी भेटीसाठीही बोलावण्यात आलं होतं. मात्र ऐनवेळी डॉ. प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आले. तर कसलीही चर्चा नसताना डॉ.भागवत कराड (Dr.Bhagwat Karad) यांना मंत्रिपद बहाल करण्यात आले. यामुळे मंत्रिपद न मिळाल्यामुळे मुंडे समर्थकांकडून सोशल मीडियावर (social media) नाराजी व्यक्त करणाऱ्या पोस्ट व्हायरल होत आहेत.
यात महत्वाची पोस्ट म्हणजे 2014 मध्ये स्व. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या बरोबर घडलेल्या प्रसंगाची आठवण करत डॉ.प्रीतम मुंडे यांच्या समावेशाची अपेक्षा ठेवणारी लक्ष वेधून घेणारी पोस्ट आहे.
काय आहे ती पोस्ट ?
24-25 मे 2014, खा.गोपीनाथ मुंडे यांचा मोदी मंत्रीमंडळात समावेश होणार नाही अशा चर्चा. हो हो नाही नाही करत अखेर साहेबांचा शपथविधी झाला. लोक आनंदाने वेडेपिसे झाले. रड रड रडले. आज प्रीतमताईंचा समावेश झाला असता तर जवळपास तेच चित्र राज्यभर पहायला मिळालं असतं !
असं का झालं नसेल बर !
कुरघोडींचं राजकारण की अजून काही ?
आठवतो का तुम्हाला मुंडे भगिनींचा प्रवास ?
असं म्हणत ‘ही तर सुरुवात आहे.!’ असं सांगून जाणारी पोस्ट सगळ्यांच लक्ष वेधून घेत समर्थकाच्या मनातील सल दाखवून देत आहे.
या निमित्तानं पुन्हा एकदा चर्चा रंगल्या.
काल झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा पंकजा मुंडे (Pankaja Munde) व डॉ. प्रीतम मुंडे या मुंडे भगिनींना भाजपातून टाळले जात आहे का? अशा चर्चा रंगु लागल्या आहेत. एकेकाळी स्व. गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक असणाऱ्या डॉ.भागवत कराड (Dr.Bhagwat Karad) यांना मंत्रिपद मिळते अन त्यांचा वारसा चालवणाऱ्या मुलीला डावलल्यामुळे मुंडे समर्थकात नाराजीचा सुर उमटत आहे.
महाराष्ट्राला महत्त्वाची खाती…
काल झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात चार मंत्रिपद महाराष्ट्राच्या वाट्याला आली आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या फेरबदलात नारायण राणे (Narayan Rane) यांच्याकडे मध्यम, लघू आणि सुक्ष्म उद्योग मंत्रालयाचा (MSME) कारभार सोपविण्यात आला आहे. हे खाते आधी नितीन गडकरींकडे होते. पुर्वीचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे रेल्वे मंत्रालयाचा कारभार देण्यात आला आहे. डॉ. भागवत कराड अर्थ राज्यमंत्री, डॉ. भारती पवार आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, तर कपिल पाटील यांच्याकडे पंचायत राज व्यवस्थेचे राज्यमंत्रीपद आले आहे.