माझं गाव

निधन वार्ता… प्रतिष्ठीत व्यापारी सतीश चिद्रवार यांचे निधन.

केज/धारुर दि.4 डिसेंबर – केजच्या व्यापारी क्षेत्रात गेली अनेक दशके केजवासीयांची सेवा करणारे एक शांत, संयमी आणि सर्वांच्या मनात आदरयुक्त व प्रेमाचे घर करून राहिलेले सतीश पुरुषोत्तम चिद्रवार यांची आज दि.4 शनिवारी सायंकाळी 6 वाजता प्राणज्योत मालवली.

(Distinguished businessman Satish Chidrawar passed away.)

मुळचे किल्लेधारूर येथील रहिवासी व गेल्या तीस वर्षांपासुन केज (Kaij) येथे स्थायिक झालेले सतीश पुरुषोत्तम चिद्रवार यांची केज शहरात प्रतिष्ठित व्यापारी (businessman) म्हणून ओळख होती. त्यांनी आपल्या शांत, संयमी व प्रामाणिकपणामुळे वेगळेपण जपले. धारुरच्या प्रतिष्ठित चिद्रवार परिवाराचा सराफा व्यापाराव्यतिरीक्त त्यांनी केज येथे किराणा व्यवसायात आपला ठसा उमटवला.

गेली एक वर्ष ते आजारी होते. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास (passed away) घेतला. धारुर (Dharur) येथील आदर्श शिक्षक आशोकराव चिद्रवार, प्रसिद्ध किराणा व्यवसायिक रत्नाकर चिद्रवार यांचे ते बंधू तर पत्रकार (Reporter) सुहास चिद्रवार यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले एक मुलगी असा परिवार आहे.

त्यांच्या निधनामुळे केज व धारुर तालुक्यात दुख व्यक्त होत आहे. त्यांच्यावर केज येथे क्रांतीनगर स्मशानभुमीत रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केज व धारुर येथील नातेवाईक, मित्र परिवार, व्यापारी व पत्रकार मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!