मॉनिंग वॉक करताना केजमध्ये प्रतिष्ठित व्यापारी पैठणकर यांचे निधन….

केज दि.१०(प्रतिनिधी)- केज (Kaij) शहरातील गुरुकृपा कृषी सेवा केंद्राचे संचालक तथा रोटेरियन संजय किसनराव पैठणकर (४७) यांचे आज सकाळी साडेसहा वाजता हृदय विकाराच्या (Heart attack) तीव्र झटक्याने निधन झाले.

बुधवारी सकाळी पत्नीसोबत मॉर्निंग वॉकला (Morning walk) गेले असताना विठाईपुरम (कळंब रोड) येथे त्यांना चक्कर आली म्हणून ते खाली बसले. पैठणकर यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मॉनिंग वॉक (Morning walk) दरम्यान त्यांना तीव्र हृदयविकाराचा (Heart attack) धक्का आल्याने त्यांचे जागीच निधन झाले. केज शहरातील अत्यंत संयमी, हुशार व कर्तृत्वान व्यापारी म्हणून ते परिचित होते. तसेच रोटरी क्लब ऑफ केजचे (Kaij) ते सक्रिय सदस्य होते. त्यांच्यावर आज सायंकाळी ४ वाजता क्रांतीनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!