अंगार-भंगार घोषणा काय देताय… हे वागणं शोभतं का तुम्हाला…पंकजा मुंडेंनी राडेबाज कार्यकर्त्यांना झापलं.

परळी दि.16 अॉगस्ट – भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांची जनआशीर्वाद यात्रा (Jan Ashirwad yatra) आजपासून (16 ऑगस्ट) सुरु झाली. मात्र यात्रा सुरु होण्याआधीच परळीत राडा पाहायला मिळाला. भागवत कराड परळीत दाखल होताच मुंडे समर्थकांनी पंकजा आणि प्रितम यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. या साऱ्या प्रकारावर पंकजा मुंडे (Pankaja Munde) चांगल्याच भडकलेल्या पाहायला मिळाल्या. अंगार-भंगार घोषणा काय देताय… हे वागणं शोभतं का तुम्हाला… असा प्रकार मला चालणार नाही, परत येऊ नका मला भेटायला, अशा शब्दात त्यांनी राडेबाज कार्यकर्त्यांना झापलं.

(Do you think it is appropriate to behave in such a way as to announce the scattering of embers?)

आज सकाळी साडे नऊच्या सुमारास भागवत कराड पंकजा मुंडे यांच्या घरी पोहोचले. पंकजा मुंडे यांनी भागवत कराड यांचं स्वागत केलं. परंतु पंकजा मुंडे यांच्या घरासमोर मुंडे समर्थकांनी घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. भागवत कराड दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करुन आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.

अंगार-भंगार घोषणा काय देताय…
भागवत कराड यांच्यासमोर राडा करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पंकजा संतापल्या. अंगार भंगार घोषणा काय देताय…. तुमच्यावर असे संस्कार आहे का? दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम सुरु आहे का?… असं वागणं मला चालणार नाही… असंच जर वर्तन असेल तर परत मला भेटायला येऊ नका… जेवढ्या उंचीच आहे मी तेवढी लायकी ठेवा, नाहीतर येऊ नका परत माझ्याकडे, असं म्हणत पंकजा संपातून गाडीच्या दिशेने निघून गेल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!