बीडमध्ये कुत्रे आणि माकडांत गँगवॉर; अख्खं गाव दहशतीखाली.

माजलगाव दि.17 डिसेंबर –  बीड (Beed) जिल्ह्यातील माजलगाव (Majalgoan) तालुक्यात सध्या लवूळ या गावात कुत्रे आणि माकडांत गँगवॉर (Gangwar) पहायला मिळत आहे. जिथे कुत्र्यांना नुसतं पाहाताच माकडं धूम ठोकतात तिच माकडं आता कुत्र्यांच्या जीवावर उठली आहेत. कुत्रे आणि माकडांमधलं भांडण या थराला गेल्यामुळे अख्खं गाव दहशतीखाली आले आहे.

(Dogs in Beed and Gangwars in Monkeys; The whole village is under terror.)

बीडमधल्या माजलगाव तालुक्यातील लवूळ भागात माकडं आलेली आहेत. परंतू काही दिवसांपासून विचित्र प्रकार पहायला मिळत आहे. सध्या गावात कुत्रे आणि माकडांमध्ये (Dogs and Monkeys) संघर्ष सुरू झाला आहे. माकडांची टोळीच्या टोळी येते आणि कुत्र्यांवर हल्ले करते. माकडांना घाबरुन जो तो जीव मुठीत धरुन पळत आहे.

माकडांच्या दहशतीमुळे लहान पोरं सोरं माकडांपासून वाचण्यासाठी सैरावैरा धावत आहेत. अख्खं गाव कुत्रे आणि माकडांच्या दहशतीखाली आहे. ग्रामस्थांनी माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी थेट धारुर (Dharur) येथील वन विभागाशी (Forest Department) संपर्क साधला आहे. मात्र वन विभागाने अद्यापही ठोस पावलं उचलली नाहीत.

माकडं येतात आणि कुत्र्यांची पिल्लं शोधतात. पिल्लू दिसलं रे दिसलं की त्या पिल्लाला उंचावर नेतात आणि तिथून फेकून देतात. आजपर्यंत कुत्र्याच्या अनेक पिल्लांवर माकडांनी हल्ले केले आहेत. काही दिवसांपूर्वी कुत्र्यांनी माकडाच्या पिल्लावर हल्ला केला होता. त्या घटनेनंतर या गावात रोज माकडं येतात आणि कुत्र्यांच्या पिल्लांवर हल्ले करतात, अशी चर्चा आहे.

माकडानं पिल्लू पळवलं की कुत्रे माकडांवर धावून जातात. या भांडणात ग्रामस्थांवर दरवाजे, खिडक्या बंद करुन बसण्याची वेळ आली. काही जण अशा या विचित्र प्रकारात जखमी झाली आहेत. ग्रामस्थांच्या म्हणण्याप्रमाणे माकडाच्या एका पिल्लास कुत्र्यांनी हल्ला करुन ठार केल्यापासून माकडे कुत्र्यांची पिल्ल मारत आहेत. कुत्रे आणि माकडांमधली ही बदले की आग कधी शमणार, आणि कधी मोकळा श्वास घेता येणार, याचीच वाट ग्रामस्थ पाहत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!