आज वाढ… बीड जिल्ह्यातील शनिवारचे कोरोना अपडेट; पहा तालुकानिहाय आकडेवारी.

बीड दि.12 जून – बीड (Beed) जिल्ह्यातील 2939 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 180 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 2759 जण निगेटिव्ह आली आहेत. जिल्ह्याची संख्या मोठ्या प्रमाणात घटत आहे. कालची संख्याही दिडशेच्या आत होती. आज मात्र संख्या दोनशेच्या जवळ आहे.

(Today’s Corona Update in Beed District; See Taluka wise statistics.)

अशी आहे तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी….
बीड-24, अंबाजोगाई-5, आष्टी-37, धारुर-7, गेवराई-17, केज-48, माजलगाव-7, परळी-3, पाटोदा-19, शिरुर-10, वडवणी-3 अशी आहे.

बीड (Beed) जिल्ह्यात नवीन कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत मोठी घटली आहे. जिल्ह्यात निर्बंध शिथिल केल्यानंतर जनजीवन पुर्वपदावर येत असल्याचे चित्र आहे. मागिल चार दिवसात संख्या उतरुन दिडशेच्या आत आली आहे. जिल्ह्यात सर्व व्यवहार सुरळीत झाली आहेत. आज शनिवार व उद्या रविवार जिल्ह्यात विकेँड लॉकडाऊन असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात दिवसभरात 11 हजार 766 नवे कोरोना रुग्ण आढळले आणि 406 कोरोना मृत्यू झाले. याच कालावधीत राज्यातील कोरोना रुग्णांपैकी 8 हजार 104 जण बरे झाले. आतापर्यंत राज्यात 3 कोटी 76 लाख 11 हजार 5 कोरोना चाचण्या झाल्या. यापैकी 58 लाख 87 हजार 853 कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 15.65 टक्के आहे.

आतापर्यंत महाराष्ट्रात 58 लाख 87 हजार 853 जणांना कोरोना झाला. यापैकी 56 लाख 16 हजार 857 जण बरे झाले तर 1 लाख 6 हजार 367 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यातील कोरोना रुग्णांपैकी 2 हजार 925 जणांचा इतर कारणांमुळे मृत्यू झाल्याचे राज्य शासनाने सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!