धारुर घाटात अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ; एक जण गंभीर जखमी.

किल्लेधारूर दि.11 नोव्हेंबर – धारुर घाटात अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून जखमीला धारुर (Dharur) ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमीची प्रकृती चिंताजनक असून सांयकाळी साडेसहा ते सात वाचण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
शहरालगत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग 548 सी (National Highway 548 C) वरील धारुर घाटात (Dharur Ghat) आज दि.11 शुक्रवारी सांयकाळी 6 ते 7 च्या दरम्यान भीषण अपघात (Accident) झाला. अपघातात दुचाकीस्वार चुन्नीलाल पुरा कोराई (वय 55 वर्ष) रा.कोहळतांडा जि.परभणी हा गंभीर जखमी झाला आहे. अज्ञात वाहनाने धडक दिल्याचे प्रथमदर्शनी घटनास्थळी दिसून येत आहे. सदर जखमीस प्रथमोपचार करुन स्वा.रा. ति. अंबाजोगाईला हलविण्यात आले आहे.
( An unknown vehicle collided with a bike in Dharur Ghat; One seriously injured. )