मराठवाड्यातील ‘या’ आमदारावरही ईडीची कारवाई

परभणीः दि.२४- शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर कर्ज घेऊन ती रक्कम आपल्या विविध कंपन्यांमध्ये गुंतवल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रासप आमदार रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) यांच्या विरोधात ईडीने कारवाई केली. काल रात्री उशिरा केलेल्या कारवाईत ईडीकडून गंगाखेड शुगर (Gangakhed Sugar) अँड एनर्जी लिमिटेड २४७ कोटी किमतींची यंत्र त्याचप्रमाणे पाच कोटी रुपयांची जमीन, योगेश्वरी हॅचरीज, गंगाखेड सोलर पावर लिमिटेडच्या परभणी बीड आणि धुळे येथील बँकांमध्ये असलेल्या सुमारे दीड कोटी रुपये किमतीच्या गुंतवणुकी आणि गंगाखेड शुगर्स लिमिटेड यांची एक कोटी दहा लाख रुपये किमतीचे समभाग इत्यादी मालमत्ता असे एकूण २५५ कोटीची मालमत्ता जप्त केली आहे.

२०१७ साली परभणी च्या गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेड या कारखान्याने २९ हजार शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर ६ बँकाकडून तब्बल ३२८ कोटींचे कर्ज उचलले होते. गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेड या कारखान्याच्या संचालक मंडळाने व बँकांच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून ज्या शेतकऱ्यांनी कारखान्याचे शेअर्स घेतले, त्याचबरोबर उस पुरवला. त्या परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, जालना या जिल्ह्यांबरोबरच इतर राज्यातीलही असंख्य शेतकऱ्यांची बनावट कागदपत्र तयार करून पाच राष्ट्रीयकृत बँका ज्यात आंध्र बँक, युको बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक तर मुंबईची रत्नाकर बँक याच्याकडून तब्बल ३२८ कोटींची रक्कम परस्पर उचलली. जेंव्हा याबाबत शेतकऱ्यांना बँकांनी नोटीसा पाठवल्या तेंव्हा हे प्रकरण उजेडात आले होते. त्यावेळी रत्नाकर गुट्टे यांच्यावर ५ जुलै २०१७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. त्या प्रकरणात दोन वर्षानंतर कारवाईला सुरुवात झाली होती. २८ फेब्रुवारी २०१९ ला गंगाखेड शुगर्स कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी नंदकुमार शर्मा, ऊस पुरवठा अधिकारी तुळशीदास अंभोरे, ऊस विकास अधिकारी बच्चूसिंग पडवळ यांना तर काही काळानतंर रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) यांनाही अटक करण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर कर्ज घेऊन ती रक्कम आपल्या विविध कंपन्यांमध्ये गुंतवल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर (Gangakhed Sugar) आणि एनर्जी लिमिटेड या कंपनीची परभणी बीड आणि धुळे येथील तब्बल २६६ कोटींची मालमत्ता काल रात्री ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!