माझं गाव

आज धारुरात येणार ‘एक दिन के मुख्यमंत्री’… सोबत युपिएससी टॉपर.

किल्लेधारूर दि.23 नोव्हेंबर – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC 2020) परिक्षेत उत्तीर्ण झालेले असिम खान यांचा सत्कार व त्यांच्या हस्ते अल हबीब जकात फाऊंडेशन या संस्थेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आज दि.23 मंगळवारी सकाळी 10 वाजता धारुर (Dharur) येथील माऊली मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात एका संस्थेच्या स्पर्धेत छत्तीसगड राज्याचे एक दिवसाचे मुख्यमंत्री (मानद) ठरलेले शहेबाज मोहम्मद फारोक मनियार यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहे.

(‘Ek Din Ke Mukhyamantri’ will come to Dharur today … along with UPSC topper.)

शहरातील मुस्लिम नवयुवकांना शिक्षणाचे महत्व पटवून त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने हल हबीब जकात फाऊंडेशन या संस्थेची मुहूर्तमेढ रोवण्यात येत आहे. माऊली मंगल कार्यालय नगर परिषद कार्यालयासमोर मंगळवारी सकाळी 10 वाजता संस्थेच्या उदघाटनाचा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमासाठी नुकतेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC 2020) परिक्षेत 558 रँक (Rank) मिळवून उत्तीर्ण झालेले आसिम किफायत खान उदघाटनासाठी उपस्थित राहणार आहेत.

प्रमुख पाहुणे म्हणून छत्तीसगड (Chhattisgarh) राज्यात एक दिवसाचे मुख्यमंत्री (Chief Minister) ठरलेले व मुंबई विद्यापिठात शोधप्रबंध करणारे शहेबाज मोहम्मद फारोक मनियार व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धारुरचे सुपूत्र डॉ. सिराज खान उपस्थित राहणार आहेत. यावेळी धारुर शहराच्या वतीने आयएएस (IAS) आसिम खान यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

कार्यक्रमात खान व उपस्थितांचे अनुभव व मार्गदर्शन यावेळी होणार आहे. या कार्यक्रमात जास्तीत जास्त मुस्लिम समाजातील विद्यार्थी, पालक व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीचे सय्यद हारुण, आवेज कुरेशी, सय्यद शाकेरअली (Sayyad Shaker), सादेकभाई मदिनेवाले, डॉ. शेख परवेज, डॉ. शेख तफील, सुभेदार सय्यद इस्माईल, अतिक मोमीन, शेख सिद्दीक, फेरोज मोमीन, सय्यद अफसर, हाफीज शेख सज्जाद, सय्यद जमिल आदींच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!