एकनाथ खडसेंना कोरोनाची लागण

जळगावः दि.१९-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकतेच प्रवेश केलेले माजी एकनाथ खडसे Eknath Khadse यांना कोरोनाची Corona लागण झाली आहे. एकनाथ खडसे उपचारासाठी मुंबईकडे रवाना झाले असून माझ्या सान्निध्यात आलेल्या लोकांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, तसेच मी बरा होईपर्यंत कोणीही भेटण्यासाठी येऊ नये, असं आवाहनही एकनाथ खडसे Eknath Khadse यांनी केलं आहे.

चाळीस वर्ष भाजपात एकनिष्ठ राहिलेले खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये NCP प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातील नेते तसेच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली होती. त्या भेटीतूनच त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही दिवसांपुर्वी एकनाथ खडसे Eknath Khadse यांच्या कन्या रोहिणी खडसे Rohini Khadse यांना कोरोनाची Corona लागण झाली होती. रोहिणी खडसे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली होती. प्रकृती उत्तम असून खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल होत असल्याची माहिती खुद्द रोहिणी खडसे Rohini Khadse यांनी दिली होती. दरम्यान कालच राष्ट्रवादीचे NCP नेते शरद पवार Sharad Pawar यांचा २१ व २२ रोजी उत्तर महाराष्ट्राचा दौरा रद्द करण्यात आला होता. आता रोहिणी खडसे पाठोपाठ एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याने ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!