धारुर तालुक्यातील ५ ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची निवड १६ फेब्रुवारीला

किल्लेधारूर दि.१०(वार्ताहर) तालुक्यातील नुकत्याच झालेल्या पाच ग्रामपंचायतच्या कारभारी निवडीचा कार्यक्रम जाहिर झाला असून दि.१६ फेब्रुवारी रोजी या पाच ग्रामपंचायतचे (Gram Panchayat) सरपंच व उपसरपंच निवडी होत आहेत. यासाठी निवडणूक विभागाने अध्यासी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. अशी माहिती निवडणूक विभाग प्रमुख नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांनी दिली.

तालुक्यात ५ ग्रामपंचायतीच्या (Gram Panchayat) निवडणूका गेल्या महिन्यात पार पडल्या. सदस्य निवडी नंतर सरपंच (Sarpanch) पदाचे आरक्षण ४ फेब्रुवारीला सोडतीमधून जाहिर झाले. जाहगीर मोहा, रुईधारुर, कोथिंबीरवाडी, भोपा व कासारी या पाच ग्रामपंचायतचे कारभारी निवडण्यात येणार आहेत. यासाठी दि.१६ फेब्रुवारी रोजी त्या त्या ग्रामपंचायतच्या कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. जागीरमोहा ग्रामपंचायत साठी अध्यासी अधिकारी म्हणून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एस. पी. गिरी, रुईधारुर ग्रामपंचायत साठी कृषि अधिकारी आमोल डाके, कासारी ग्रामपंचायत विस्तार अधिकारी अनिल चौरे, कोथिंबीरवाडी ग्रामपंचायत साठी सहा. निबंधक एस.पी. नेहरकर तर भोपा ग्रामपंचायतसाठी मंडळ कृषी अधिकारी मुसळे साहेबराव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दि.१६ ला होत असलेल्या सरपंच (Sarpanch) व उपसरपंच निवडीतील ग्रामपंचायतीत जागीर मोहा व कासारी येथील सरपंच पद नागरीकांचा इतर मागास प्रवर्ग महिला राखीव तर रुईधारुर व भोपा येथील सरपंच पद नागरीकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण आरक्षित आहे तर कोथिंबीरवाडीचे सरपंच पद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!