सभापती पदी सुनिल शिनगारे यांची निवड; प्रथमच तरुणाला मिळाली संधी.

किल्लेधारूर दि.12 जुलै – धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Market committee) सभापती पदाच्या निवडणूकीत सुनिल शिनगारे यांनी बाजी मारली असून हि संस्था ताब्यात ठेवण्यात भाजपाला यश आले आहे. शिनगारे यांच्या निवडीने प्रथमच तरुणाला संधी मिळाल्याने कार्यकर्त्यानी आनंदोत्सव साजरा केला.

(Election of Sunil Shingare as Chairman; For the first time, the young man got a chance.)

धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Dharur Agricultural Produce Market Committee) संचालक मंडळाची मुदत नऊ महिने राहिलेली आहे. हि संस्था भाजपाच्या ताब्यात आहे. सभापती महादेव बडे यांचे अकाली निधन झाल्याने येथील सभापती पद रिक्त झाले होते. या निवडीसाठी आज बाजार समितीच्या सभागृहात दुपारी एक वाजता विशेष बैठक घेण्यात आली.

सभापती (chairman) निवडी साठी सहायक निबंधक मोटे यांच्या उपस्थीत बैठक होऊन सभापती पदा साठी भाजपा (BJP) कडून विद्यमान उपसभापती सुनिल शिनगारे व माजी उपसभापती महादेव तोंडे यांचे अर्ज दाखल करण्यात आले. तर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) कडून चंद्रकांत लगड यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता. भाजपात (BJP) अंतर्गत गटबाजीचा फायदा घेता येईल का या हेतूने हा अर्ज दाखल करण्यात आला.

मात्र निवडणूकीत प्रत्यक्ष भाजपा कडून विद्यमान उपसभापती सुनिल शिनगारे यांचा अर्ज ठेवण्यात आला. महादेव तोंडे यांचा अर्ज मागे घेण्यात आला. भाजपाचे सुनिल शिनगारे व राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) चंद्रकांत लगड यांचे मध्ये सरळ लढत झाली. गुप्त मतदान पध्दतीने मतदान घेण्यात आले. भाजपाचे सुनिल शिनगारे यांना दहा तर राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत लगड यांना सात मते मिळाली. पक्षीय बलाबला नुसार मतदान पडल्याने भाजपाचे ताब्यातील संस्था भाजपाचे ताब्यात ठेवण्यात यश आले.

सभापती (chairman) म्हणून सुनिल शिनगारे यांची निवड झाल्याने सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे. हि संस्था भाजपाचे ताब्यात ठेवण्यासाठी युवक नेते रमेशराव आडसकर (Ramesh Adaskar) व जेष्ठ नेते राजाभाऊ मुंडे हे सुरूवाती पासून लक्ष ठेवून होते. आज हे दोन्ही नेते दिवसभर तळ ठोकून होते. संचालकांना विचारात घेऊन त्यांनी हि निवड केली. सभापती पदी सुनिल शिनगारे यांचे निवडी नंतर कार्यकर्त्यानी फटाक्याची अतिशबाजी करत आंनदोत्सव साजरा केला.

सुनिल शिनगारे हे युवक नेते रमेशराव आडसकर (Ramesh Adaskar) यांचे कट्टर समर्थक असल्याने आडसकर समर्थक कार्यकर्त्याचा उत्साह वाढला असून भावी काळात राजकीय उभारी साठी हि निवड फायद्याची ठरणार आहे. भाजपा गटाला एकसंघ ठेवण्यात रमेशराव आडसकर व राजाभाऊ मुंडे यांना यश आले यामुळे कार्यकर्त्यात आंनद व्यक्त केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!