घात-अपघात

electric कोळपणी करताना विद्युत तारेच्या स्पर्शाने शेतकऱ्यासह दोन बैल ठार ; धारुर तालुक्यातील घटना.

68 / 100 SEO Score

किल्लेधारुर दि.1 जुलै – electric धारुर तालुक्यातील संगम येथे शेतात कोळपणी करताना शेतातील विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने शेतकरी व दोन बैल दगावल्याची दुर्दैवी घटना आज दि.1 जुलै सोमवार रोजी घडली.

याबाबत अधिक वृत्त असे की, धारुर तालुक्यातील संगम येथील शेतकरी बालासाहेब बाबासाहेब डापकर (वय 40) हे आपल्या दिंद्रुड शिवारातील गट क्र. 708 मधील शेतात सकाळी अकराच्या सुमारास दोन सालगडी व बैलांसह कोळपणी करत होते. यावेळी शेतातील वीजेच्या electric खांबाला असलेल्या तारेला लोखंडी कोळप्याचा स्पर्श झाला. या स्पर्शाने शेतकरी बालासाहेब डापकर व दोन बैलांना वीजेचा धक्का बसून जागीच ठार झाले तर सोबत असलेले दोन गडी दुर फेकल्या गेले. या दुर्दैवी घटनेमुळे संगम व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!