लसीकरणातील तांत्रिक अडचण दूर; आता मिळणार 4 अंकी सिक्युरिटी कोड. पहा जुनी नवी पध्दत …

नवी दिल्ली दि.8 मे – कोरोना प्रतिबंधक लस (Corona vaccine) टोचून घेण्यासाठी नोंदणी करणाऱ्यांना आता नवा 4 अंकी सिक्युरिटी कोड मिळेल. कोविन पोर्टल, कोविन अॅप अथवा आरोग्यसेतू अॅप यांच्या माध्यमातून ऑनलाइन नोंदणी (Online registration) करणाऱ्यांना हा नवा 4 अंकी सिक्युरिटी कोड मिळेल. नवी व्यवस्था आज शनिवार 8 मे 2021 पासून अंमलात येईल अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
(Eliminate technical difficulties in vaccination; Now you will get a 4 digit security code. See old new method …)
ऑनलाइन नोंदणी (Online registration) प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी 4 आकडी सिक्युरिटी कोड (Security code) हा पर्याय वापरण्याचा निर्णय झाला आहे. यामुळे कोरोना लसीचा (Corona vaccine) पहिला तसेच दुसरा डोस घेण्यासाठी कोणत्या केंद्रावर, कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळेच्या स्लॉटमध्ये जायचे हे लक्षात येईल. नागरिकांचा गोंधळ टळेल. सिक्युरिटी कोड (Security code) नोंदणी करणाऱ्याने दिलेल्या मोबाइल नंबरवर मेसेजच्या स्वरुपात येईल. लसीकरणाच्यावेळी हा कोड दाखवणे बंधनकारक आहे.
लसीकरण (Vaccination) केंद्रावर सिक्युरिटी कोडची नोंद केली जाईल. यामुळे लसीकरणाच्या डेटाबेसमधील दोष दूर करण्यास मोठी मदत होणार आहे. नागरिकांचा त्रास कमी होणार आहे. लसीकरण (Vaccination) प्रक्रियेतील पारदर्शकता राखणे शक्य होणार आहे.
कोविन पोर्टल – https://www.cowin.gov.in/home
कोविन पोर्टलवर नव्याने नोंदणी करण्यासाठी – https://selfregistration.cowin.gov.in/
आरोग्यसेतू अॅप – https://play.google.com/store/apps/details?id=nic.goi.aarogyasetu
लस घेण्यासाठी अनेकांच्या अपाँईंटमेंट मिळत नसल्याच्या तक्रारी होत्या. मात्र अॉनलाईन नोंदणी करत असताना अनेकांच्या चुका होत असल्याने रजिस्ट्रेशन होवूनही अपाँईंटमेंट मिळत नसत. सदरील नोंदणी व्यवस्थित व सुटसुटीत होण्यासाठी डॉ. सचिन शेकडे यांनी जुनी प्रक्रियेची सुटसुटीत स्टेप्स खास वाचकांसाठी……
1) गुगल वर Cowin.gov.in सर्च करा
Cowin वर क्लिक करा
2) उजव्या कोपऱ्यात Registration /Sign in वरती क्लिक करा
3) दहा अंकी मोबाईल क्रमांक टाका, OTP याच नंबर वरती जाईल
4) OTP टाका (NHP through OTP आलेला असेल
5) Add Member
A) Aadhaar click
B) Aadhar Number
C) Aadhar vard वरील नाव
टाका
D) जन्मवर्ष
Confirm click
परत Add member करा,या एकाच मोबाईल नंबर वरती जास्तीत 4 लोकाची नोंद होते.
आता सर्वात महत्त्वाचे 18 वर्ष ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांनी लस बुक करण्यासाठी/Appointment घेण्यासाठी
6) Shedule वर click करा , त्या खालीच shedule Now वर click करा
7)तुमचा पिनकोड टाका व सर्च करा.
8) लस उपलब्ध असलेले दवाखाने येतील, तेथे हिरव्या कलर मध्ये लस असतील (तुमच्या वयाचा ग्रुप) तर त्यावर क्लिक करा
9) Time slot click करा, नंतर confirm करा व slip download करा.
10) Appointment slip नुसार लसीकरण करून घ्या, आरोग्य विभागाला सहकार्य करा
आता प्रशासनाकडून 100 ऐवजी 200 लसीची क्षमता राहणार आहे. लस उपलब्ध नसेल तर परत उपलब्धता तपासा व लस बुक करा, व ठरल्या वेळेत त्याच दवाखान्यात जावुन लसीकरण घ्या व आरोग्य विभागाला सहकार्य करा.
(घाईगडबडीत आपल्याला किंवा आपल्यामुळे इतरांना अथवा प्रशासनाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या.)