बीड जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट…

बीड दि.6 जूलै – बीड (Beed) जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात येत आहे. आज 3218 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 132 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 3086 जण निगेटिव्ह आली आहेत.
(Today’s corona update from Beed district …)
तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी….
बीड-19, अंबाजोगाई-6, आष्टी-38, धारुर-2, गेवराई-24, केज-8, माजलगाव-9, परळी-3, पाटोदा-8, शिरुर-9, वडवणी-6 अशी आहे.
बीड (Beed) जिल्ह्यात कोरोना बाधितांचा वेग मंदावला आहे. सध्या दररोजच्या अहवालात संख्या शंभर तर दोनशेमध्ये स्थिरावलेली दिसुन येते. राज्यासह देशातही कोरोना बाधितांच्या (Corona Positive) संख्येत कमालीची घट झालेली आहे.
दरम्यान, सोमवारी महाराष्ट्रात 06 हजार 740 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच 13 हजार 027 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. 24 तासात महाराष्ट्रात 51 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत 59 लाख 97 हजार 587 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 61 लाख 04 हजार 917 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या महाराष्ट्रात 1 लाख 16 हजार 827 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.