जिल्ह्यातील नगराध्यक्ष पदाचा निवडणूक कार्यक्रम जाहिर; पहा कधी होणार अध्यक्ष उपाध्यक्ष निवडी.

मुंबई दि.1 फेब्रुवारी – महाराष्ट्रात नुकत्याच 106 नगर पंचायतच्या सार्वत्रिक निवडणूका झाल्या असून आता नगराध्यक्ष (mayor) पदाच्या निवडीचा मार्गही मोकळा झालेला आहे. आज मंगळवारी (दि.1) नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीचा कार्यक्रम बीड जिल्हाधिकाऱ्यांनी जाहिर केला आहे.
(District Mayor’s election program announced; See when the Presidential Vice President election will take place.)
राज्यात 106 नगर पंचायतच्या निवडणूका होवून मतमोजणीनंतर नगराध्यक्ष (Mayor) पदाच्या आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले होते. नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर आता लवकरच नगरपंचायतींवरची प्रशासकीय राजवट संपुष्टात येणार आहे.
नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडी केव्हा होणार?
निवडणूकीत विजयी झालेल्या नगरसेवकांसह सर्वसामान्य नागरीकांना नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडी केव्हा होणार? हा प्रश्न पडला होता. आज बीड जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडीसाठी विशेष सभेचा कार्यक्रम जाहिर केला आहे.
यानूसार जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरुर, वडवणी व केज नगरपंचायतच्या अध्यक्ष पदासाठी दि.7 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 2 तर उपाध्यक्ष पदासाठी 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे. यानंतर विशेष सभेत पिठासिन अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पूर्ण होईल.
बीड जिल्ह्यात पाच नगराध्यक्ष
बीड जिल्ह्यात पाच नगर पंचायतच्या निवडणूका पार पडल्या. यात केज, वडवणी, आष्टी, पाटोदा व शिरुर कासार या नगर पंचायतीचा समावेश आहे. यातील आष्टी, पाटोदा व शिरुर कासार या तीन नगर पंचायतीवर भाजपाचे (BJP) निर्विवाद वर्चस्व आहे. वडवणी येथे आ. प्रकाशदादा सोळंके (Prakash Solanke) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) व माजी आमदार केशव आंधळे यांच्या आघाडीने बहुमत मिळवले आहे.
सध्या वडवणीचे राष्ट्रवादी व आघाडीचे नगरसेवक जि.प. सभापती जयसिंग सोळंके यांच्या निगराणीत निकाल घोषित झाल्यापासून सहलीवर आहेत. केजमध्ये (Kaij) मात्र जनविकास आघाडी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांची युती झाली असून आता नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष कोणाकडे असणार याची उत्कंठा लागली आहे. आज होणाऱ्या आरक्षण सोडतीनंतर नगराध्यक्ष पदावर कोणाची वर्णी लागणार हे निवडीनंतरच स्पष्ट होणार आहे.
असे आहे आरक्षण…
आष्टी,पाटोदा,शिरूर कासार तिन्ही नगरपंचायतचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहेत. तर केज नगराध्यक्ष SC सर्वसाधारण व वडवणी सर्वसाधारण खुला गटासाठी आरक्षित आहे.