रुपाली चाकणकर यांना धमकी देणाऱ्या बाबत समोर आली ही माहिती….

मुंबईः दि.२७- राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना त्यांचे कार्यालय तोडून आणि जाळून टाकण्याचा धमकीच्या फोन नंतर खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी (Police) वेगाने तपास केल्यानंतर आरोपी मानसिक रुग्ण असल्याची माहिती समोर आली.
पोलिसांच्या (Police) मिळालेल्या माहितीनुसार, रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना धमकावणारा जयंत रामचंद्र पाटील (वय ३५, रा. तांबवे, ता. वाळवा) हा मानसिक रुग्ण असल्याचे समोर आले आहे. जयंत रामचंद्र पाटील याने अर्वाच्य भाषा वापरून चाकणकरांचे कार्यालय पेटवून देण्याची धमकी दिली होती. बी.एस्सी.पर्यंत शिक्षण घेतलेला हा तरुण मानसिक रुग्ण असल्याचे तेथील राष्ट्रवादीच्या (NCP) पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या तरुणाची घरची परिस्थिती अत्यंत बेताची असून वडील शेतकरी आहेत.