केजमधील घटनेमुळे खळबळ; दिले सोने निघाले मातीचे खडे… सतर्कता बाळगण्याचे आवाहन…

किल्ले धारूर दि.19 फेब्रुवारी – गुरुवारी केज शहरात सोन्याचांदीचे दागिने उजळून देण्याच्या बहाण्याने  वृद्ध महिलेचे 1 लाख 15 हजारांचे दागिने भामट्यांनी लंपास केल्याची घटना घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून धारुर शहरवासियांना विशेषतः महिला वर्गाला सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

( Excitement due to incident in Kaij; Be careful … )

सध्या अॉनलाईन फसवणूकीचे ( Online fraud ) प्रकार वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र आजही गल्ली बोळात फिरुन फसवणूक करण्याचा जुना फंडा चोरट्यांकडून वापरात येत असल्याचे दिसून आले आहे. केज शहरात सोने उजळून देतो म्हणत वयोवृध्द महिलेच्या हातात खडे बांधलेली पुडी ठेवून दागिने लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला.

गुरुवारी ( दि.17) फेब्रुवारी केज ( Kaij ) येथील समर्थनगर मध्ये एक घटना उघडकीस आली. दोन भामटे गल्लीबोळात फिरत होते. यावेळी त्यांना जोशी यांच्या घराचे चॅनेल गेट उघडे दिसले. हे पाहून अनोळखी इसमानी रजनीबाई अनंत जोशी ( वय 78 वर्ष) यांना तुमचे जुने सोन्याचे दागिने उजळून नव्या सारखे करून देतो असे म्हणून रजनीबाई जोशी यांचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठन, अडीच तोळे वजनाचे गंठन घेतले.

हातचलाखी करून अदलाबदल करुन त्या भामट्यांनी एक पुडी जोशी यांच्या हातात देऊन निघुन गेले. ते दोघे अनोळखी इसम गेल्यानंतर रजनीबाई जोशी यांनी ती पुडी उघडून पहिली असता त्यात सोन्याच्या दागिन्याऐवजी खडे बांधून दिले असल्याचे आढळले. हे पहाता जोशी यांना फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्याकडे धाव घेऊन 1 लाख 15 हजारांचे दोन अनोळखी इसमांनी फसवणूक केल्याप्रकरणी फिर्याद दिली.

अज्ञात दोन आरोपींच्या विरोधात केज पोलीस (Police) ठाण्यात गु.र.नं. 43/2022 भा.दं.वि. 380 व 34 नुसार गुन्हा दाखल केला.घटनेचा अधिक तपास एपीआय शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दिलीप गित्ते करीत आहेत. तसेच कोणी सोन्याचांदीचे दागिने उजळून देतो, अथवा स्वस्त दरात देतो असे आमिष दाखवत असेल तर याला बळी न पडता जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क करुन माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

धारुर (Dharur)  शहरात या घटनेमुळे सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शहरात विशेषतः महिलावर्गांनी अशा स्वरुपाच्या संशयिताकडून सोने उजळून देतो म्हणून आढळल्यास तात्काळ पोलिसांना किंवा जवळच्या नातेवाईक अथवा सामाजिक कार्यकर्त्यांना कळवावे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!