जळालेला मृतदेह आढळल्याने केज तालुक्यात खळबळ…

केज दि.3 एप्रिल – केज तालुक्यात जळालेल्या अवस्थेत मानवी सांगाडा (burnt body) आढळून आल्यामुळे खळबळ उडाली असून हा प्रकार घातपाताचा (Murder) असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घटनास्थळी युसुफ वडगाव पोलीसांनी (Police) धाव घेतली आहे.
केज (Kaij) तालुक्यातील आडस-होळ रस्त्यावरील वेदांत साधनास्थळा जवळ काही अंतरावर अनोळखी व्यक्तीचा जळालेला मृतदेह आढळून आला. सदर प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच युसुफ वडगाव पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे.
सदरील व्यक्तीला घटनास्थळीच कडब्याच्या बुचाडात जाळण्यात आले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलीस तपासात याबाबतीत खुलासा होईल. मृतदेह पुर्णपणे जळालेला असल्याने ओळख पटविण्याचे पोलीसांसमोर आव्हान असणार आहे. मृतदेह नेमका महिलेचा की, पुरुषाचा याचा अंदाजही येत नाही.
( Excitement in Kaij taluka after finding burnt body … )