खळबळजनक…. बीड जिल्ह्यातील पोलिस उपाधिक्षका विरुध्द बलात्काराचा गुन्हा

मुंबईः दि.२२- बीड जिल्ह्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस उपाधिक्षका विरुध्द मुंबईत खात्यातील एका महिला अधिकाऱ्यांच्या तक्रारी वरुन बलात्काराचा गुन्हा आज सकाळी नोंदवण्यात आला आहे. यामुळे बीड जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
सध्या मुंबईत (Mumbai) पोलिस खात्यात कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलिस निरिक्षक दर्जाच्या महिला अधिकाऱ्यानी बलात्काराची (Rape) फिर्याद दिली. यात बीड जिल्ह्यातील पोलिस उपाधिक्षक आरोपी आहेत. फिर्यादीची दखल घेत विशाखा समितीने चौकशी केली असून मुंबईच्या (Mumbai) रफी अहेमद किडवाई मार्ग पोलिस ठाण्यात संबंधित फिर्यादीतील आरोपी सध्या बीड (Beed) जिल्ह्यात कार्यरत असलेल्या पोलिस (Police) उपाधिक्षकावर बलात्काराचा (Rape) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामुळे बीड (Beed) जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली आहे.