राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार विद्याताई चव्हाण.

मुंबई दि.5 मे – राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार विद्याताई चव्हाण यांची निवड करण्यात येत असल्याची घोषणा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार फौजिया खान यांनी जाहीर केले आहे.

रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी पक्षाकडे प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. गेले अनेक दिवस रिक्त असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेकांची नावे चर्चेत होती. यात बीडच्या ॲड. हेमाताई पिंपळे, रेखाताई फड यांचाही समावेश होता.

आता माजी आमदार विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress Party) महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान (Fouzia Khan) यांनी आज ही घोषणा केली आहे. याशिवाय राज्यात पहिल्यांदाच महिला आघाडीच्या विभागवार अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे.

विद्याताई चव्हाण यांची राष्ट्रवादीच्या आक्रमक महिला नेत्या अशी ओळख आहे. त्यांना कामाचा मोठा अनुभव आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषद व नगर परिषदेच्या निवडणूकीत महिला आघाडीची महत्त्वाची भुमिका असणार आहे. या निवडीनंतर देशातील महत्त्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष होत आहे. महागाई प्रचंड वाढत आहे. यावर आम्ही सातत्याने आवाज उठवणार असल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित अध्यक्षा विद्या चव्हाण यांनी दिली आहे.

( Former MLA Vidyatai Chavan as the State President of NCP Women’s Congress. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!