छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न; बीड जिल्ह्यात खळबळ.

बीड, 23 ऑक्टोबर – छेडछाडीला कंटाळून एका अल्पवयीन मुलीने आत्महत्येचा प्रयत्न (attempt to suicide) केल्याची घटना बीड जिल्ह्यात उघडकीस आली. मुलीची प्रकृती सध्या स्थिर असून याबाबत पिंपळनेर पोलिसांनी (Police) दखल घेतली आहे.

(Attempted suicide of a minor girl due to harassment; Excitement in Beed district.)

पीडित मुलगी 15 वर्षांची असून विष प्राशन करुन तिने आपलं जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. बीड जिल्ह्यात (Beed) घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पीडित मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून रुग्णालयात दाखल करताना तिची प्रकृती चिंताजनक होती. वेळीच उपचारार्थ दाखल केल्याने सध्या पिडीतेची प्रकृती स्थिर असल्याचे कळते.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित मुलगी इयत्ता नववीत शिक्षण घेते. तिच्याच शाळेत शिक्षण घेणारा एक मुलगा वारंवार तिची छेड (harassment) काढत असे. दि.21 रोजीही सदरील मुलाने मुलीला त्रास दिला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या पीडित मुलीने याबाबत आपल्या कुटुंबाला सांगितले. यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी त्या मुलाला जाब विचारुन समजही दिली.

वारंवार होत असलेल्या या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय मुलीने शुक्रवारी (दि.22) विष प्राशन केले. या घटनेनंतर तिला उपचारासाठी बीडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक (Assistant Police Inspector) बाळासाहेब आघाव यांनी पिडीतेची चौकशी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!