चित्रपटासह छोट्या पडद्यावर ठसा उमटवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री “जीजी” यांचं निधन

कराडः दि.१५- अनेक मराठी चित्रपटात अभिनय केलेल्या आणि छोट्या पडद्यावरील लागिरं झालं जी Lagir Zale Ji या मालिकेत जिजी ही व्यक्तीरेखा साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके Kamal Thoke यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. ऐन दिवाळीत त्यांचं निधन झाल्याने मालिका विश्वासह चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे. मराठी कला क्षेत्रातील प्रतिभावंत ज्येष्ठ अभिनेत्री अशी कमल ठोके यांची ओळख होती. १४ नोव्हेंबरला बंगळुरू Bengluru या ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
प्रसिद्ध मालिका लागिरं झालं जी Lagir Zale Ji मध्ये जिजीच्या भुमिकेत आपल्या अभिनयातून कमल ठोके Kamal Thoke यांनी प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली. सासर माहेर, सख्खा भाऊ पक्का वैरी, कुंकू झालं वैरी, भरला मळवट, बरड अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत. १४ नोव्हेंबरला संध्याकाळी बंगळुरु Bengluru या ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मराठी सिनेसृष्टीत जीजी अशी कमल ठोके यांची ओळख आहे. त्यांनी अभिनय क्षेत्रात येण्यापुर्वी शिक्षिका म्हणून काम केलं आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, सून नातवंडं, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर कराड येथील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या जाण्याने चित्रपट सृष्टीसह चाहत्यांत हळहळ व्यक्त होत आहे.