कोविड सेंटरवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निरोप

किल्लेधारूर दि.३०(वार्ताहर) येथील कोविड केअर सेंटरवर (Covid-19) काम केलेल्या ३२ कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागाच्या वतीने उत्कृष्ट सेवा दिल्या बद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून गौरव करत निरोप देण्यात आला.

येथील सामाजिक न्याय विभागाच्या मुलींच्या वस्तिगृहात सुरु करण्यात आलेले कोविड केअर सेंटर (Covid-19) जिल्हा प्रशासनाच्या सुचनेवरुन बंद करण्यात आले. या कोविड सेंटरवर एकुण ३२ कर्मचाऱ्यांनी सेवा दिली. आपत्ती काळात कोणीही तयार होत नसताना या लोकांनी उत्कृष्ट सेवा देत कोविड केअर सेंटरला जिल्ह्यात नावलौकिक मिळवून दिला. कर्मचाऱ्यांच्या सेवेबद्दल येथे उपचार घेणाऱ्या अनेकांनी या कर्मचाऱ्यांचे यापुर्वी कौतूक केले. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय व ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने या ३२ कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ घेण्यात आला. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह, शाल श्रीफळ व प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे, वैद्यकिय अधिक्षक डॉ. चेतन आदमाने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!